WhatsApp Payments : व्हॉट्स ॲपवर पेमेंट्स फीचरवर बँक बॅलन्स तपासण्‍यासाठी या टीप्स वापरा……

WhatsApp Payments : आता व्हॉट्सअॅपवर पेमेंट्स फीचर वापरून बँक बॅलन्स तपासू शकता; या आहेत टीप्स
WhatsApp Payments : आता व्हॉट्सअॅपवर पेमेंट्स फीचर वापरून बँक बॅलन्स तपासू शकता; या आहेत टीप्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : (WhatsApp Payments) भारतात नोव्हेंबर 2020 मध्ये लॉन्च करण्यात आले.  (WhatsApp Payments) सेवा 2021 मध्ये अधिक वापरकर्त्यांसाठी आणली. आता WhatsApp पेमेंट सेवा भारतातील सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

ॲपच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात मोअर (3 डॉट्स ) वर क्लिक केल्यावर पेमेंट पर्यायावरुन पेमेंटमध्ये जाता येते. 'एनपीसीआय' ने जारी केलेल्या UPI मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, पेमेंट सेवेसाठी वापरकर्त्यांचा UPI पिन WhatsApp संग्रहित करत नाही. सेवा वापरणारे लोक केवळ पेमेंट पाठवू किंवा प्राप्त करू शकत नाहीत तर WhatsApp वापरून त्यांच्या बँक खात्यातील शिल्लक देखील तपासू शकतात.

(WhatsApp Payments) व्‍हाॅटस ॲपवर बँक बॅलन्स तपासण्याचे दोन पर्याय आहेत. पण त्यापूर्वी, पेमेंट सेवा कशी सुरु करायची आणि कशी वापरायची याची माहिती घेणे महत्त्‍वाचे आहे.

(WhatsApp Payments) व्हॉट्स ॲपवरील अधिक पर्याय वरती म्हणजेच तीन डॉटवरती जा आणि UPI ला सपोर्ट असणाऱ्या बँक खात्याचे नंबर भरा. खात्याशी लिंक असणारा मोबाईल नंबर WhatsApp मोबाईल नंबर असावा.

एकदा बँक खाते व्हॉट्सॲप पेमेंटशी लिंक झाल्यानंतर, वापरकर्ते आता सेवा वापरू शकतात.

WhatsApp वर बँक खात्यातील बॅलेन्स कसा तपासायचा? दोन पध्दतीने व्हॉट्स ॲपवर बॅलेन्स पाहता येतो.

पहिली पध्दत

(WhatsApp Payments) व्हॉट्सॲप मोबाइल ॲपवरील पेमेंटवर जा आणि लिंक केलेल्या बँक खाते शोधा.

बँक खाते निवडल्यानंतर, चेक बॅलेन्स या पर्यायावर क्लिक करा.

यावर तुमचा UPI पिन एंटर करा.

एकदा तुम्ही UPI पिन सबमिट केल्यानंतर, स्क्रीनवर दिसणारी तुमचे बँक खात्यावरील बॅलेन्स तपासा.

दुसरी पद्धत

(WhatsApp Payments) तुमच्या WhatsApp मोबाइल ॲपवरील पेमेंट नोटिफिकेशनवर जा.

तुमच्या पसंतीचे पेमेंट पद्धत निवडा.

अकाऊंट बॅलेन्स पहा पर्याय निवडा.

तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यांमधून संबंधित अकाऊंट निवडा.

यात UPI पिन टाकून पडताळणी करा. यावरुन बॅलेन्स तपासा.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news