Nagpur : कोल्हापूरच्या पथकाने नागपुरात दिसलेल्या मगरीला पकडून सोडले जंगलात | पुढारी

Nagpur : कोल्हापूरच्या पथकाने नागपुरात दिसलेल्या मगरीला पकडून सोडले जंगलात

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या महाराज बागेतील नाल्यातील मगरीला रेस्क्यू करण्यात कोल्हापूरच्या पथकाला यश मिळाले आहे. यात वनविभागाच्या पिंजरा लावलेल्या मोहिमेला फारसे यश मिळाले नाही. नागा नदीच्या परिसरातील ही मग मागील दोन महिन्यांपासून कित्येकजणांना दिसत होती. (Nagpur)

यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाकडूनही पिंजरा लावून रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला. पण मगर चपळ असल्याने पिंजऱ्यात पकडण्यात मोहीम यशस्वी झाली नाही.

Nagpur : नागपूरच्या नाग नदीतील मगरीला रेस्क्यू

राज्यातील कृष्णा नदी वाई, माहुली (सातारा), कन्ऱ्हाड, सांगलीतून पुढे कर्नाटकात जाते. अनेक घटनांमध्ये येथील मगरीचे रेस्क्यू ऑपरेशन वनविभागाचे योग्य नियोजन करत असते याच अनुभवाचा फायदा नागपूरच्या नाग नदीतील मगरीला रेस्क्यू करण्यात झाला आहे. या मगरीला सुखरूप जंगलात जाऊन सोडण्यात आले आहे.

शनिवारी ही चमू दाखल झालू असताना त्यांनी या मगर असलेल्या भागात जाऊन पाहणी केली. त्यानंतर नागपूरच्या वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक केली.

या बैठकीनंतर रात्री ८ वाजतापासून कामाला सुरूवात केली. प्रत्यक्षात ९ वाजताच्या सुमारास सुरू झालेली मोहीम मध्यरात्री ३ ते साडेतीन वाजताच्या सुमारास पकडण्यात यश आले.

यात सांगली वन विभागाच्या चार जणांच्या चमूने शिताफीने जाळे टाकून मगरीला रेस्क्यू केल्याची माहिती आहे. त्यानंतर त्या मगरीला नागपूर ट्रान्सझिट ट्रिटमेंट सेंटरला नेण्यात आले.

Back to top button