Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना Edit करता येणार पाठवलेला मेसेज! लवकरच फिचर उपलब्ध होणार

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना Edit करता येणार पाठवलेला मेसेज! लवकरच फिचर उपलब्ध होणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ट्विटरनंतर व्हॉट्सअॅप देखील एका नव्या फीचरवर काम करत आहे. हे फिचर युजर्सना त्यांचे मॅसेज एडिट करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. लवकरच फिचर उपलब्ध होईल अशी चर्चा सुरू आहे. अलीकडेच Apple ने सर्व आयफोन युजर्ससाठी त्यांचं लेटेस्ट व्हर्जन iOS 16 रोल आऊट केलंय. ज्यामध्ये निफ्टी फीचर्सचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. हे वारंवार टायपो करणाऱ्या आणि चुकून मेसेज पाठवणाऱ्या लोकांसाठी वरदान असल्याचे म्हटले जात आहे.

iOS 16 च्या येण्याने आयफोन युजर्स पाठवलेले मेसेज एडिट करू शकतील आणि ते स्वतःलाही मेसेज पाठवू शकतील. आता व्हॉट्सअ‍ॅप अशाचप्रकारच्या फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपच्या अपडेट ट्रॅकर Wabetainfo ने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. Wabetainfo च्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअ‍ॅप आता डेस्कटॉप अ‍ॅपवर भविष्यातील अपडेटमध्ये मेसेज एडिट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करत आहे. (Whatsapp New Feature)

WabetaInfo ने एका ब्लॉगपोस्टमध्ये सांगितलं की, 'एडिट फीचरवर संदर्भात खूप दिवसांपासून चर्चा होत आहे. त्या विषयी बातम्या देखील आल्या होत्या, पण आता खरोखरच नवीन पाठवलेले मॅसेज एडिट करण्याचे फीचर लवकरच उपलब्ध होणार आहे.' यासोबतच व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकरने एक स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे. ज्यामध्ये WhatsApp एक नवीन व्ह्यू डेव्हलप करत आहे, जो iOS 16 अपडेटसह iMessage फीचरप्रमाणेच लोकांना मूळ मेसेजमध्ये बदल करण्यासाठी टेस्क्ट एडिट करण्याचा ऑप्शन देईल. या फीचर्सवर अजूनही काम सुरू आहे, त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना एक महत्त्वाचे फिचर्स मिळणार आहे, असे म्हटले आहे. (Whatsapp New Feature)

या शिवाय रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, 'एडिट हिस्ट्री उपलब्ध नसावी, परंतु हे वैशिष्ट्य विकासाधीन असल्याने, भविष्यात हे वैशिष्ट्य प्रसिद्ध होण्यापूर्वी ते लागू केलं जाऊ शकतं. कोणत्याही परिस्थितीत आम्ही काही नवीन शोध लावल्यावर तुम्हाला कळवू. तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर हे एडिट मेसेज फीचर कधी मिळेल? हे अजून स्पष्टपणे सांगता येणार नाही. पण या फीचरमध्ये लवकरात लवकर डेव्हलपमेंट होईल, अशी आशा ठेवायला हरकत नाही.' दरम्यान हे फीचर प्रत्यक्षात कधी येईल, याबद्दल माहिती देण्यात आली नसली, तरी एक चांगली सुविधा युजर्सना मिळणार आहे, हे मात्र नक्की.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news