पुढारी ऑनलाईन : मेटा ही व्हॉट्सॲपची पेरेंटींग कंपनी आहे. व्हॉट्सॲप या इन्स्टंट मेसेजिंग कंपनीने यूजर्सची समस्या लक्षात घेत, एक भन्नाट फिचर (WhatsApp feature) आणले आहे. या फिचरमुळे युजर्संना त्यांची प्रायव्हसी जपता येणार आहे. WhatsApp ने Chat Lock हे प्रायव्हसी फिचर आणत असल्याचे त्यांच्या ट्विटरवरून स्पष्ट केले आहे.
whatsapp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. Whatsapp गेल्या काही दिवसांच्या वापरासाठी नववीन अपडेट्स आणि फीचर्स लॉन्च करत आहे. व्हॉट्सॲपने नुकतेच Chat Lock हे फिचर आणत असल्याचे जाहीर केले आहे. या नवीन फिचरमुळे युजर्संना चॅटिंगमध्ये वैशिष्ट गोपनीयता बाळगता येणार आहे. युजर्स या फिचरचा वापर करून त्यांचे खासगी आणि वैयक्तिक संभाषणे पासवर्डसह लॉक करू शकणार आहेत. यामुळे व्हॉट्सॲपमधील (WhatsApp feature) तुमचे वैयक्तिक मेसेज कोणीही वाचू शकणार नाही. या प्रायव्हसी फिचरमुळे तुम्ही तुमचा फोन कोणाच्याही हातात निसंकोचपणे देऊ शकता, असे कंपनीने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या फीचरमध्ये (WhatsApp feature) कंपनी आणखीअपडेट्स आणू शकते. हे फिचर लोकांची प्रायव्हसी आणखी सुरक्षित करण्यासाठी रोलआऊट करण्यात आले आहे. तसेच हे फिचर iOS आणि Android या दोन्ही यूजर्संसाठी देण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.