व्हॉटस ॲपवरील मेसेज एडिट करता येणार : नव्या फिचरवर सुरू आहे काम!

व्हॉटस ॲपवरील मेसेज एडिट करता येणार : नव्या फिचरवर सुरू आहे काम!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – व्हॉटस अपवर आपण पाठवलेल्या मेसेजमध्ये काही चुक राहिली असेल तर तो मेजेस डिलीट करून नव्याने टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही; पण या समस्येवर व्हॉटस अप उपाय शोधत आहे. आपण पाठवलेला व्हॉटस ॲप मेसेज एडिट करण्याची सुविधाही येत्या काही दिवसांत उपलब्ध होणार आहे. (whatsapp could get edit button for messages)

व्हॉटस ॲप संदर्भातील अपडेट WaBetaInfo या ट्विटर हँडलवर उपलब्ध असते. या हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. व्हॉटस ॲपवर एडिट केलेला मेसेज कसा असेल, याचे स्कीनशॉट या हँडलवर शेअर करण्यात आले आहे. जर मेसेज एडिट केलेला असेल तर Editted असा टॅग या मेसेजवर दिसणार आहे.

ही फीचर कशा प्रकारे काम करेल, याची माहिती देण्यात आलेली नाही. सध्या व्हॉटस ॲपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये काही चूक असेल तर हा मेसेज डिलिटच करावा लागतो; पण मेसेज डिलिट केला तर The message was deleted असा संदेश झळकतो, त्यामुळे ज्याला मेसेज पाठवला आहे, त्याच्या मनात मेजेस काय होता याबद्दलची उत्सुकता चाळवते. त्यामुळे मेसेजमधील चूक दुरुस्त करण्याची सुविधा व्हॉटस ॲप देणार आहे.

ट्विटरही एडिट बटण देण्यासाठी काम करत आहे. अशा प्रकारची सुविधा व्हॉटस ॲपवर येणार आहे; पण हे फिचर कधीपर्यत येणार आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही.व्हॉटस ॲपच्या 2.22.20.12 अँड्रॉईड बेटा व्हर्जनवर हे फिचर पाहिले गेले आहे. हेच फिचर कालांतराने iOS बेटावरही येणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news