पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सोमवारपासून (6 मे) पावसाला सुरुवात होत आहे. ही सुरुवात विदर्भ आणि मराठवाड्यातून होणार असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र 10 मेनंतर सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, रविवारी अकोला 44.3, तर पुणे येथील तळेगाव ढमढेरेमध्ये 43.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मराठवाडा ते तामिळनाडूपर्यंत वार्यांची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे सोमवारपासूनच मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक भागात मेघगर्जना अन् विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने रविवारी दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यातून 6 मेपासून पावसाला सुरुवात होत आहे. विदर्भात 6 ते 10 मे, तर मराठवाड्यात सध्या 6 व 7 मे रोजी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा