Weather update : येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यातील ‘या’ भागात हाेणार अवकाळी पाऊस

Weather update : येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यातील ‘या’ भागात हाेणार अवकाळी पाऊस

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या आणि रखरखत्या उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील विदर्भ आणि विदर्भालगतच्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता (Weather update) वर्तवली आहे. या संदर्भातील माहिती पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ.के. एस होसाळीकर यांनी एक्स पोस्टवरून दिली आहे.

डॉ.होसाळीकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुढील ४,५ दिवस विदर्भात व संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाटांसह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठावाड्यातील नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांत उद्या (दि.६ मे) आणि मंगळवारी (दि.७ मे) वादळी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता Weather update)असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या:

Weather update: भारतात पुढील एक आठवडा अवकाळी पावसाचा

भारतातील पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण द्वीपकल्पावरील राज्यातील काही भागांवर पुढील आठवडाभर (रविवार ५ मे ते रविवार १२ मे ) गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या बुलेटीनमध्ये स्पष्ट केले आहे. अशी माहिती डॉ.के.एस होसाळीकर यांनी एक्स पोस्टवरून दिली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news