Weather Update: उत्तरेत गारठा, महाराष्ट्रासह दक्षिणेत अवकाळीची शक्यता

फाईल फोटो
फाईल फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तरेकडील काही राज्यात प्रमाणात थंडीची सुरूवात झाली आहे. दरम्यान दाट ते अतिघनदाट धुक्यांची चादर देखील उत्तरेतील अनेक राज्यावर पसरली आहे. उत्तरेकडील राज्य थंडीने गारठली असताना, दक्षिणेत अवकाळी पावसाची स्थिती आहे, असे देखील भारतीय हवामान विभागाच्या बुलेटीनमध्ये स्पष्ट केले आहे. (Weather Update)

दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अवकाळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण व गोव्यात पुढील चार दिवस हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ढगाळ हवामानासह तापमानात घटही होण्याची शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाने दिलेल्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे. (Weather Update)

Weather Update: किमान तापमानात किंचित वाढ; थंडी घटली

राज्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात बुधवारी 2 ते 3 अंशांनी वाढ झाल्याने बहुतांश भागांतून थंडी गायब झाली होती. असे वातावरण 5 जानेवारीपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागांत बुधवारी ढगांनी गर्दी केल्याने किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाल्याने गारठा कमी झाला. (Weather Update)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news