Weather Forcast: तीव्र उष्म्यानंतर राज्यातील ‘या’ भागात आता अवकाळीचा इशारा

Rainfall Forecast
Rainfall Forecast

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाच्या झळा जाणवत आहेत. दरम्यान वातावरणातील उष्णता देखील मोठ्या वाढली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे अंगाची लाही लाही होत आहे. लोक तीव्र उन्हाच्या झळांमुळे हैराण झाले आहेत. दरम्यान पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत अवकाळीची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे उन्हाच्या तीव्र झळांपासून काहीसा दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे. (Weather Forcast)

हवामान विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार, गोव्यासह, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ५ एप्रिल ते ९ एप्रिसलपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आजपासून (दि.५ एप्रिल) पाडव्यापर्यंत (दि.९ एप्रिल) काही प्रमाणात अवकाळी पावसाची शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. (Weather Forcast)

मध्य-दक्षिण द्विपकल्पीय प्रदेशातील 'या' राज्यात अवकाळी

ईशान्य भारतासह पश्चिम हिमालयातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या विस्तारित पावसाची शक्यता आहे. तर काही भागात हिमवृष्टी देखील होऊ शकते. भारतीय मध्य आणि दक्षिण द्विपकल्पीय प्रदेशात देखील काही प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, पदुच्चेरी केरळ, आंध्रप्रदेश, यमेन या राज्यात देखील पावसाची शक्यता आहे. (Weather Forcast)

Weather Forcast: ईशान्येकडील 'या' राज्यांत मुसळधार

ईशान्येकडील आसाम आणि मेघालय या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच अरूणाचल प्रदेशमध्ये आज ५ एप्रिल ते रविवार ७ एप्रिलपर्यंत पर्यंत जोरदार पावसाची किंवा हिमवृष्टीची शक्यता आहे. दरम्यान ६ एप्रिल रोजी पावसाची तीव्रता अधिक असेल असेही हवामान विभागाने दिलेल्या आजच्या बुलेटिनमध्ये स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news