काळजी घ्या ! आगामी 72 तास चिंतेचे; राज्यात उष्णतेची लाट कायम, पावसाचाही इशारा | पुढारी

काळजी घ्या ! आगामी 72 तास चिंतेचे; राज्यात उष्णतेची लाट कायम, पावसाचाही इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. बहुतांश शहरांचे कमाल तापमान 39 ते 42 अंशांवर गेले आहे. आगामी 72 तास अवस्थ करणारे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच, 5 ते 7 एप्रिलदरम्यान पावसाचाही अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागाचे कमाल तापमान गुरुवारी 40 अंंशांवर गेले. विदर्भातील ब्रह्मपुरी गावचा पारा गुरुवारी राज्यात सर्वाधिक 42.3 अंशांवर गेला होता. दरम्यान, राज्यात 5 ते 7 एप्रिलदरम्यान पावसाचा अंदाज देण्यात आल्याने आगामी 72 तास उष्ण व दमट वातावरण राहणार आहे. हे वातावरण अस्वस्थ करणारे आहे. त्यामुळे काळजी घ्या, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

या भागात पावसाचा अंदाज…

  • मध्य महाराष्ट्र : 5 ते 7 एप्रिल (मध्यम पाऊस)
  • मराठवाडा : 5 ते 7 एप्रिल (हलका पाऊस)
  • विदर्भ : 6 ते 9 (मध्यम पाऊस)

गुरुवारचे कमाल- किमान तापमान..

ब्रह्मपुरी 42.3 ( 25), पुणे 39.2 ( 18.9), अहमदनगर 38.9 (20.5), जळगाव 40.2 ( 21.8), कोल्हापूर 38.6 ( 23.2), महबळेश्वर 33.1 (21.4), मालेगाव 42 (22), नाशिक 38.2 (19.5), सांगली 40.5 (23.1), सातारा 39.2 (22.5), सोलापूर 41 (25.5), छत्रपती संभाजीनगर 38.6 (24.2), परभणी 40.5 (23.9), नांदेड 40.2 (26.4), बीड 40.2 (26.4), अकोला 41.8 (23.8), अमरावती 40.8 (24.7), चंद्रपूर 41.2 (23.4), गोंदिया 39.8 (22.2), नागपूर 41.2 (23.4), वाशिम 41.4 (21.6), यवतमाळ

हेही वाचा

Back to top button