Eknath Shinde : आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्तच संख्याबळ; एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

Eknath Shinde : आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्तच संख्याबळ; एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्तच संख्याबळ आहे, आणखी काही आमदार आमच्यासोबत जोडले जातील. आमदारांचा हा आकडा अजून वाढणार आहे. आमच्या कुठल्याही अटी नाहीत, अशी प्रतिक्रिया मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. गुवाहाटी येथून ते एका वृत्तवाहिनीशी थेट संवाद साधत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. त्यामुळे  हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. संध्याकाळी आमदारांची तातडीने बैठक बोलवण्यात आली असून, यानंतरच पुढची रणनिती ठरवणार आहे. राजीनामा द्यायचा की नाही, हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार नितीन देशमुख यांच्यावर झालेल्या जबरदस्ती केलेला आरोप हा खोटा आहे. आम्ही त्यांना जबरदस्ती ठेवलं असतं, तर आमचे लोक त्यांना सोडण्यासाठी आले असते का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. आमच्यासाठी  हिंदुत्व महत्वाचं आहे. माझ्यासोबत असलेले आमदारही हिंदुत्वाशी एकनिष्ठ असून, सत्तेसाठी हिंदुत्वाशी कधीच तडजोड करणार नसल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news