वाशिम: सोनखासचा जवान अमोल गोरे चीन सीमेवर शहीद

वाशिम: सोनखासचा जवान अमोल गोरे चीन सीमेवर शहीद
Published on
Updated on

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : अरुणाचल प्रदेशातील कमेंग व्हॅली येथे चीन सीमेवर देशाचे रक्षण करताना सोमवारी (दि.१७) दुपारी 4.30 वाजता जवान अमोल गोरे यांना वीरमरण आले. वाशिम तालुक्यातील सोनखास येथील अमोल गोरे भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत होते. अमोल दोन सहकाऱ्यांसमवेत चीन सीमेवर गस्तीवर होते. यावेळी कमेंग व्हॅली येथे मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहत होते. यादरम्यान पाण्याचा मोठा प्रवाह त्यांच्या दिशेने आला. या प्रवाहात अमोल व त्याचे दोन सहकारी जवान वाहून जात होते. यावेळी अमोलने आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना पाण्याच्या प्रवाहातून वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अमोलच्या डोक्याला पाण्याच्या प्रवाहातील एक मोठा दगड लागला आणि त्यात अमोलचा मृत्यू झाला. आपल्या दोन सहकारी जवानांना वाचविण्यात अमोलला यश आले. मात्र, अमोलला वीरमरण पत्कारावे लागले.

सन 2010 मध्ये अमोल भारतीय सैन्यात भरती झाला होता. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या अमोलचे लग्न वैशाली यांच्याशी सन 2016 मध्ये झाले. अमोलने सैन्यात असताना पोहण्याचे प्रशिक्षणसुध्दा घेतले होते. तो पोहण्यात तरबेज होता. अमोलच्या पश्चात पत्नी वैशाली, दोन मुले, शेतकरी असलेले वडील तानाजी गोरे, आई, एक भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. अमोलचे पार्थिव आज रात्री 2 वाजताच्या सुमारास विमानाने गुवाहाटी येथून पुणे येथे पोहोचणार आहे. पुणे येथे पोहोचताच सैन्याच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर लष्कराच्या वाहनाने अमोलचे पार्थिव वाशिम तालुक्यातील सोनखास येथे 19 एप्रिल रोजी सकाळी पोहोचणार आहे. शहीद अमोल गोरे यांच्या पार्थिवावर सोनखास या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news