वाशिम : आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; २ आरोपींसह ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

आयपीएलवर सट्टा
आयपीएलवर सट्टा

वाशिम ; पुढारी वत्‍तसेवा समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे वारंवार अवैध धंद्यांविरोधात कारवाई सत्र राबविले जाते. त्यामध्ये अवैध धंदे करून समाजाची शांतता बिघडवू पाहणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करत कायद्याचा वचक निर्माण केला जातो. या पार्श्वभूमीवर सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेस गुप्त सुत्रांद्वारे माहिती मिळाली कि, ग्राम अनसिंग येथील बस स्टॅड चौक व माळी वेटाळ या दोन ठिकाणी काही इसम मोबाईल फोनच्या सहाय्याने RCB विरुद्ध LSG या सामन्यावर लोकांकडून मोबाईलद्वारे क्रिकेट सामन्यामधील प्रत्येक रन, बॉलिंग व बॅटिंग यावर पैसे लावून घेऊन हार जीतचा जुगार सट्टा लावत आहेत.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्था.गु.शा. पथकाने पंचासह ग्राम अनसिंग येथील बस स्टॅड चौक येथे छापा टाकला व मोबाईल फोन व टीव्ही संच असा ३१ हजारांचा IPL सट्टा साहित्य मुद्देमालासह एक आरोपी ताब्यात घेतले. तसेच ग्राम अनसिंग येथीलच माळी वेटाळ येथे छापा टाकला असता, मोबाईल फोन व टीव्ही संच असा ४० हजारांचा IPL सट्टा साहित्य मुद्देमाल अश्या ०२ ठिकाणावरून एकूण ७१ हजाराच्या मुद्देमालासह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सदर आरोपींवर पोलीस स्टेशन अनसिंग येथे कलम ४, ५ अ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक पोउपनि.शब्बीर पठाण, पोहवा.किशोर चिंचोळकर, दीपक सोनवणे, पोना.अमोल इंगोले, प्रवीण राऊत, गजानन गोटे, मपोना.रेश्मा ठाकरे, पोकॉ.संतोष शेणकुडे, शुभम चौधरी व चापोहवा.रमेश जामकर यांनी पार पाडली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल दक्ष असून नागरिकांनी अवैध धंद्याबाबतची माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अंमलदार यांना द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news