वाशीम : धक्‍कादायक! मालेगावातील आरोग्‍य वर्धनी केंद्रात बॅटरीच्या प्रकाशात महिलांची कुटुंब नियोजन शस्‍त्रक्रिया

कुटुंब नियोजन शस्‍त्रक्रिया
कुटुंब नियोजन शस्‍त्रक्रिया
Published on
Updated on

वाशीम ; पुढारी वृत्‍तसेवा मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा आरोग्य वर्धनी केंद्रामध्ये वेळेवर जनरेटर सुरु न झाल्याने बॅटरीच्या प्रकाशात अनेक महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्याअंतर्गत येत असलेल्या किन्हीराजा आरोग्य वर्धनी केंद्रामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाला. यावेळी वेळेवर जनरेटर सुरू न झाल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या काही महिलांवर बॅटरीच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे एखाद्या महिलेच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला असून, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून संबंधित आरोग्य यंत्रणेवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news