वाशीम : माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Nawab Malik Interim Bail
Nawab Malik Interim Bail
Published on
Updated on

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लाँड्रिग प्रकरणी जेलमध्ये असतानाच त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश वाशीम पोलिसांना बुधवारी (दि.१६) दिला होता. त्यानुसार वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री उशिरा नवाब मलिक यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

समीर वानखेडे यांच्या अनुसूचित जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेऊन, जातीवाचक टिप्पणी केल्याप्रकरणी वाशीम जिल्हा न्यायालयाने माजी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. समीर वानखेडे यांचे चुलत भाऊ संजय वानखेडे यांनी वाशीम न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती.

समीर वानखेडे यांनी स्वतः याचिका दाखल करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर समीर वानखेडे यांनी २४ ऑगस्ट २०२२ रोजी स्वतः वाशीम येथे येऊन याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी (दि.१५) सुनावणी झाली. न्यायालयाने मलिक यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मलिक सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न केले जात असतानाच आता वाशीम जिल्हा न्यायालयाच्या या आदेशानुसार त्यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news