अमिषा पटेलविरोधात वॉरंट जारी, पैसे घेतले पण काम केले नाही; जाऊ शकते तुरुंगात

amisha patel
amisha patel

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'गदर' फेम अभिनेत्री अमिषा पटेलच्या अडचणी येत्या काळात आणखी वाढू शकतात. अभिनेत्री विरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. ती वेळेवर कोर्टात पोहोचली नाही तर तिच्या अडचणी वाढू शकतात. रिपोर्ट्सनुसार, अमिषाच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कोर्टाने दिलेल्या तारखेपर्यंत अमिषा हजर न झाल्यास तिच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. मुरादाबादच्या ACJM-5 न्यायालयाने अमिषा पटेलविरुद्ध हे वॉरंट जारी केले आहे. अभिनेत्री अमिषाला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
तिच्यावर आरोप आहे की, ११ लाख इतकी मोठी फी घेऊनही ती कार्यक्रमाला पोहोचली नाही. मात्र, हे प्रकरण अलीकडचे नसून पाच वर्षे जुने आहे. आता या प्रकरणावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.

लग्नाला हजेरी लावायची होती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ११ लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून घेतले होते. मात्र आगाऊ रक्कम घेऊनही ती या कार्यक्रमाला आली नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्री एका लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी होणार होती. जिथे तिला परफॉर्म करायचा होता पण आगाऊ रक्कम घेऊनही ती या कार्यक्रमाला पोहोचली नाही आणि आता ते प्रकरण कोर्टात पोहोचले.

२०१७ चे प्रकरण

इव्हेंट कंपनीचे व्यवस्थापक पवन वर्मा यांनी २०१७ मध्ये अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी मुरादाबादमध्ये बराच काळ खटला सुरू होता. अमिषा आणि तिच्या सहकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या समन्समध्ये असे म्हटले आहे की, वॉरंटनंतरही अमिषा कोणत्याही वैध कारणाशिवाय कोर्टात हजर होत नाही, तर तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी केले जाऊ शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news