शंभर माजी नगरसेवकांत ‘धाकधूक’

शंभर माजी नगरसेवकांत ‘धाकधूक’

पांडुरंग सांडभोर

पुणे : महापालिकेच्या तब्बल 100 माजी नगरसेवकांचे भवितव्य 25 प्रभागांतील अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणामुळे टांगणीला लागले आहे.हे नगरसेवक इच्छुक असलेल्या प्रभागात आता महिला की खुला प्रवर्ग, यामधील नक्की कोणते आरक्षण पडणार, यानुसार राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे अनेकांची पुन्हा महापालिकेत येण्याची संधी हुकूही शकणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर या प्रभागांमधील एससी व एसटीचे आरक्षण बुधवारी पालिकेकडून जाहीर करण्यात आले. त्यात 23 प्रभागांत एससी व 2 प्रभागांत एसटीचे आरक्षण निश्चित झाले आहे. आता आगामी काळात या प्रभागातील नक्की कोणत्या 13 जागा महिलांसाठी आरक्षित होणार, याचे चित्र सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे. या महिला आरक्षणावरच महापालिकेत नगरसेवकपद भूषविलेल्या जवळपास 103 जणांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातील महिला व पुरुष, या दोन्ही माजी माननीयांचा समावेश आहे.

म्हणजेच, महापालिकेच्या या संबंधित 25 प्रभागांपैकी बहुतांश प्रभागांत इच्छुक असलेल्या माजी नगरसेवकांची संख्या दोन ते तीनपेक्षा अधिक आहे. त्यात एक जागा आरक्षित झाल्यानंतर त्या ठिकाणी उर्वरित दोन जागांसाठी मोठी स्पर्धा होणार आहे. त्यात ज्या ठिकाणी दोनपेक्षा अधिक पुरुष माजी नगरसेवक इच्छुक आहेत, अशा प्रभागांमध्ये पुरुष एससी आणि उर्वरित दोन जागा महिला आरक्षित झाल्यास संबंधित खुल्या वर्गातील पुरुष इच्छुकांना थेट घरी बसावे लागणार असून, घरातील अथवा अन्य महिलांना संधी द्यावी लागणार आहे. महिला माजी नगरसेवकांबाबतीत सुध्दा हीच अवस्था असणार आहे. अशीच अवस्था एससी व एसटी प्रवर्गातील माजी नगरसेवकांचीसुध्दा आहे. ज्या प्रभागात एससी अथवा एसटी महिला आरक्षित पडेल, अशा प्रभागात संबंधित प्रवर्गातील पुरुष माजी नगरसेवकाची संधी हुकणार आहे. मात्र, हे सर्व चित्र महिला आरक्षण सोडतीनंतरच खर्‍या अर्थाने स्पष्ट होऊ शकणार आहे.

आरक्षित प्रभाग व त्यामधील संभाव्य इच्छुक माजी नगरसेवक

प्रभाग क्र.1: अनिल टिंगरे, रेखा टिंगरे, ऐश्वर्या जाधव, मारुती सांगडे
 प्रभाग क्र 20: अरविंद शिंदे, लता राजगुरू, प्रदीप गायकवाड, चाँदबी नदाफ
प्रभाग क्र. 50 : सुभाष जगताप, अनिल जाधव, साई दिशा माने, महेश वाबळे
प्रभाग क्र. 48: वर्षा साठे, बाळासाहेब ओसवाल, पिंटू धावडे, रूपाली धावडे
प्रभाग क्र. 8 : शीतल सावंत, सतीश म्हस्के, सागर माळकर
प्रभाग क्र. 27 : अविनाश बागवे, अर्चना पाटील, मनीषा लडकत, हीना मोमीन, रफिक शेख, लता बनकर, शांतीलाल मिसाळ, बापू कांबळे                                                                                                                                                                     प्रभाग क्र. 9 : अविनाश साळवे, संजय भोसले, श्वेता चव्हाण, अश्विनी लांडगे, शिवाजी क्षीरसागर, हनीफ शेख, किशोर विटकर
प्रभाग क्र. 11 : सुनीता वाडेकर, बंडू ढोरे, श्रीकांत पाटील, आनंद छाजेड, करीम शेख, अर्चना कांबळे
प्रभाग क्र. 7 : डॉ. सिध्दार्थ धेंडे, योगेश मुळीक, मीनल सरवदे, आनंद सरवदे
प्रभाग क्र. 37 : प्रिया गदादे, अनिता कदम, आनंद रिठे, विनायक हनमघर, मनीषा बोडके, शंकर पवार, स्वाती मोरे, राहुल तुपेरे
प्रभाग क्र.38- आबा बागूल, महेश वाबळे, रघू गौडा, अशोक हरणावळ, अश्विनी कदम
प्रभाग क्र. 42 : अशोक कांबळे, फारूक इनामदार, विजया वाडकर, रुक्साना इनामदार
प्रभाग क्र.26 : आनंद आलकुंटे, प्रशांत म्हस्के, कविता शिवरकर, कालिंदी पुंडे, धनराज घोगरे.
प्रभाग क्र. 10: बाळासाहेब बोडके, राजू पवार, आशा साने, रेश्मा भोसले, सोनाली लांडगे, स्वाती लोखंडे
प्रभाग क्र. 39 : राजश्री शिळीमकर, प्रवीण चोरबेले, श्रीकांत पुजारी
प्रभाग क्र. 21 : उमेश गायकवाड, मंगला मंत्री, लता धायरकर, हिमाली कांबळे, सुरेखा कवडे, बाबू वागस्कर, वनिता वागस्कर
प्रभाग क्र. 46 : नाना भानगिरे, संजय घुले, प्राची आल्हाट
प्रभाग क्र 19 : गणेश बिडकर, सुजाता शेट्टी, सदानंद शेट्टी, पल्लवी जावळे, लक्ष्मण आरडे, कल्पना बहिरट, अजय तायडे
प्रभाग क्र. 4 : भैयासाहेब जाधव
प्रभाग क्र. 12 : सनी निम्हण, स्वप्नाली सायकर, अर्चना मुसळे, संगीता गायकवाड, कैलास गायकवाड, दत्ता गायकवाड.
प्रभाग क्र. 3 : राहुल भंडारे
प्रभाग क्र. 14 : किरण दगडे, प्रमोद निम्हण, रोहिणी चिमटे, स्वाती निम्हण

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news