मुंबई; पुढारी ऑनलाईन : मागील दोन वर्षांपासून भारतासाठी सलग एकदिवसीय सामने खेळणाऱ्यांमध्ये शिखर धवन याचे नाव आघाडीवर घेतले जाते. शिवाय सातत्याने या दरम्यान त्याने खेळलेल्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. उलट त्याने महत्त्वाचे वरिष्ठ खेळाडूंच्या विश्रांती काळात त्याने संघाचे नेतृत्त्व केले व संघास विजय मिळवून दिला आहे. आफ्रिके विरुद्धच्या एकदिसीय सामन्यात तो पुन्हा एकदा भारताचे नैतृत्व करणार आहे. सातत्याने संघासाठी मौल्यवान कामगिरी बजावणाऱ्या या वरिष्ठ खेळाडूने पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्यासाठी स्वत:ला तयार व तंदुरुस्त ठेवले असून माझा फोकस सध्या आगामी एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेवर आहे.
सातत्याने एकदिवसीय सामने खेळताना ३६ वर्षांच्या शिखर धवनने स्वत:ला अत्यंत फिट ठेवले आहे. तसेच त्याने विश्वचषकात खेळण्यासाठी देखील स्वत:ला सिद्ध ठेवले आहे. याशिवाय त्याने शक्य तितक्या अधिकाअधिक काळ भारतासाठी खेळण्याचा निर्धार केला आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, मला आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायला आवडते. हा एक वेगळा अनुभव असतो आणि यामुळे मी समाधानी आहे. मागील काळात मी अशा मोठ्या स्पर्धांमध्ये समानधानकारक कामगिरी बजावली आहे. जेव्हा मी टीम इंडियाची ब्लू जर्सी घालतो तेव्हा माझ्यावर एक वेगळाच दबाव असतो. पण, एक अनुभवी खेळाडू म्हणून मला माहिती आहे की अशा दबावाला कसे सामोरे जायचे आहे. हाच दबाब मला प्रेरणा देतो आणि माझ्या चांगल्या कामगिरीसाठी मला प्रेरित करतो. या गोष्टींना मी कधीच घाबरत नाही कारण माझे सर्व लक्ष तयारीवर असते आणि भक्कम तयारीने मी मैदानात उतरतो.
या शिवाय शिखर धवन म्हणाला, माझे पूर्ण लक्ष पुढील वर्षी खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसी विश्व चषकाच्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचे आहे. यासाठी मी भारताकडून अधिकाधिक सामने खेळू इच्छितो. याच दरम्यान मधील काळात आयपीएल सारखी स्पर्धा खेळली जाते. येथे देखील चांगली कामगिरी बजावण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामने आणि टी २० सामन्यात खेळून स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.
शिखर धवन याला अलिकडे भारतात खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिके दरम्यान खेळताना पाहिले होते. त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात संघाचे नेतृत्त्व केले होते. या मालिकेत भारताने ३- ० असे निर्भेळ यश मिळवले होते. नुकताच भारतीय संघाने झिम्बाम्बेचा दौरा केला. या दौऱ्यात त्याला आधी कर्णधार करण्यात आले. नंतर केएल राहूल तंदरुस्त झाल्यावर त्याच्याकडे नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
शिखर धवनने ३४ कसोटी सामने खेळली आहेत यामध्ये त्याने २३१५ धावा बनवल्या. १५८ एकदिवसी सामन्यांमध्ये त्याने ६६४७ धावा केल्या आहेत. तर ६८ टी २० सामने खेळणाऱ्या धवनने १७५९ धावा केल्या आहेत. अत्यंत अनुभव संपन्न असणारा हा खेळाडू नव्या तरुणांना प्ररित करतो आणि त्यांना मैदानावर मदत करत असतो. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना तरुण खेळाडू स्वत:चा सन्मान असल्याचे मानतात. पुन्हा एका दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो नेतृत्व करताना आपल्याला दिसणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेपुर्वी त्याने स्वत:बद्दल समाधान व्यक्त केले आहे. माझी कारर्किद सुंदर असल्याचे सांगितले. आता माझ्याकडे वेगळी जबाबदारी दिली आहे आणि या आव्हानाचा सामना करताना या गोष्टीचा देखील मी आनंद घेत असतो असे म्हटले आहे.
अधिक वाचा :