मुंबई; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (Wankhede Vs Malik) यांच्या विवाहाबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा प्रत्यक्ष विवाह करणारे काझी आता माध्यमांसमोर आले आहेत. "वानखेडेचं संपूर्ण कुटुंब मुस्लीम आहे. त्याचे आई, वडील, बहीण, मुलीकडचे सर्वजण मुस्लीम आहेत. धर्माबाबत वानखेडे हे खोटं बोलत आहेत", असे स्पष्टीकरण काझी मुजम्मिल अहमद यांनी दिले आहे.