Volkswagen Taigun and Virtus : फॉक्सवॅगनने ‘या’ दोन कारच्या रंगात केला बदल; पहा नव्या मॉडेल कशा चमकतायत

Volkswagen Taigun and Virtus : फॉक्सवॅगनने ‘या’ दोन कारच्या रंगात केला बदल; पहा नव्या मॉडेल कशा चमकतायत

पुढारी ऑनलाईन डेस्क : फॉक्सवॅगन कंपनीने त्यांच्या कार ग्राहकांसाठी एक खुशखबर दिली आहे. कंपनीने मंगळवारी (दि. १८) त्यांच्या दोन प्रसिद्ध कार मॉडेलच्या नव्या GT Plus व्हेरिअंटचे अनावरण केले आहे. यातील एक कार मॉडेल हे सेडान प्रकारातील व्हर्टस (Virtus), तर दुसरे एसयुव्ही प्रकारातील टायगुण (Taigun) हे आहे. दोन्ही कार आकर्षक रंग आणि नव्या फिचर्सने सुसज्ज असणार आहेत. कंपनीच्या या सुधारित आवृत्तींच्या कार मॉडेलवरुन पडदा हटविल्यानंतर आता पुन्हा एकदा फॉक्सवॅगन कंपनी चर्चेत आली आहे. जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती. (Volkswagen Taigun and Virtus)

सुधारित मॉडेलपैकी एक व्हर्टस जी टी प्लस ही मिड-साइज प्रकारातील एक स्पोर्टी लुक असणारी कार आहे. कारच्या स्टायलिंग आणि एक्सटीरिअरमध्ये असे अनेक बदल केलेले आहेत, ज्यामुळे या मॉडेलला स्पोर्टी लुक प्राप्त झाला आहे.

या दोन्ही नव्या व्हेरिअंटचे लाइनअप अपडेट केल्यामुळे व्हर्टसच्या सहावरुन सात ट्रिम्स पहायला मिळतील तर, टायगुन मध्ये सातवरुन नऊ ट्रिम्स पहायला मिळतील. (Volkswagen Taigun and Virtus)

फोक्सवॅगन व्हर्टसची फिचर्स

फोक्सवॅगनच्या व्हर्टसच्या नव्या जीटी प्लस या मॉडेलच्या डिझाईनबाबत सांगायचे झाले तर, यामध्ये एक विशेष रेडिअटर ग्रिल आणि १६ इंचच्या नव्या अॅलॉय व्हिल असतील. कार्बन स्टील ग्रे रुफ याचे डुअल-टोन स्टाइलमध्ये वाढ करेल. यामुळे सनरुफ केबिनचा प्रशस्त आणि हवादार असा अनुभव मिळेल.

व्हर्टसचे हे नवे व्हेरिअंट डीप ब्लॅक पर्ल अशा रंगात पहायला मिळेल. तसेच 10.09-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, आरामदायी आसन, पुश बटण स्टार्ट स्टॉप, वायरलेस फोन चार्जिंग, 6 एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक एसी अशा फिचर्सनी सुसज्ज असेल.

Virtus GT Plus ला 1.5-लीटर TSI Evo पेट्रोल इंजिन मिळते जे 148 HP पीक पॉवर जनरेट करते. नुकतेच या कारचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसून आले.

फोक्सवॅगन टायगुनची फिचर्स

Volkswagen Tigun SUV ला 10.1-इंच सेंट्रल इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि 8-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह एक मोठा ड्युअल-टोन केबिन, तसेच Android Auto आणि Apple CarPlay या सारख्या कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.

टायगुनमध्ये सभोवतालची हवेशीर फ्रंट सीट्स आणि पॅनोरॅमिक सनरूफ, स्वयंचलित हवामान नियंत्रण, पुन्हा डिझाइन केलेले एसी व्हेंट्स देखील मिळतील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात अनेक एअरबॅग्ज आणि मागील पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत. व्हर्टसप्रमाणे टायगुन देखील डीप ब्लॅक पर्ल अशा रंगात पहायला मिळेल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news