राज्यात यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांची चलती!

राज्यात यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांची चलती!
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशात काही प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष करून अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए, विधी, कृषी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचे अधिक प्रवेश झाले असून, गेल्या वर्षीपेक्षा रिक्त जागांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांचीच चलती असल्याचे स्पष्ट झाले आहे. अभियांत्रिकी पदवी शिक्षणाला यंदा मागणी वाढली असून, यंदा विक्रमी प्रवेश झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 8 हजार विद्यार्थ्यांनी यंदा अधिक प्रवेश घेतले आहेत. 1 लाख 45 हजार 484 जागापैकी 1 लाख 17 हजार 651 जागा भरल्या आहेत.

तर एकूण 36 हजार 4 जागा रिक्त आहेत. मास्टर ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजीच्या 10 हजार 138 जागा आहेत. त्यापैकी 3 हजार 651 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर 6 हजार 570 जागा रिक्त आहेत. एमबीएच्या 44 हजार 92 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 37 हजार 72 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर 7 हजार 20 जागा रिक्त आहेत. बॅचलर इन डिझाईनसाठी 155 जागा आहेत. त्यासाठी 160 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, 94 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर 67 जागा रिक्त आहेत.

मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन अर्थात एमसीएसाठी 13 हजार 123 जागा असून 11 हजार 41 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर 2 हजार 82 जागा रिक्त आहेत. बॅचरल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नोलॉजीसाठी 672 जागा उपलब्ध असून 235 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे तर 437 जागा रिक्त आहेत. मास्टर ऑफ आर्किटेक्चरच्या 610 जागा उपलब्ध आहेत आणि 174 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. बीए, बीएस्सी बीएडच्या एकात्मिक अभ्यासक्रमासाठी 453 जागा उपलब्ध आहेत.

120 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विधी अभ्यासक्रमाच्या पाच वर्षे प्रवेशासाठी 12 हजार 423 जागा असून 8 हजार 8 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या अभ्यासक्रमाच्या 4 हजार 415 जागा रिक्त आहेत. कृषी अभ्यासक्रमांच्या 15 हजार 623 जागा असून, त्यापैकी 11 हजार 670 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे  तर 3 हजार 953 जागा रिक्त आहेत. फाईन आर्ट एज्युकेशनच्या 766 जागा आहेत त्यापैकी 626 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून 191 जागा रिक्त आहेत. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असल्याचे सीईटी सेलने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news