VLC Media Player वर भारतात बंदी, वेबसाइट, VLC डाउनलोड लिंक ब्लॉक, कारण आले समोर

VLC Media Player वर भारतात बंदी, वेबसाइट, VLC डाउनलोड लिंक ब्लॉक, कारण आले समोर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : VideoLAN प्रोजेक्टद्वारे विकसित केलेले सर्वात लोकप्रिय मीडिया प्लेयर सॉफ्टवेअर आणि स्ट्रीमिंग मीडिया सर्व्हर VLC Media Player आता भारतात काम करत नसल्याचे दिसून आले आहे. MediaNama च्या एका रिपोर्टनुसार व्हीएलसी मीडिया प्लेअर भारतात दोन महिन्यांपूर्वीच ब्लॉक करण्यात आले आहे. पण कंपनी आणि भारत सरकारने याबाबत कोणताही अधिकृत माहिती दिलेली नाही.

काही रिपोर्टनुसार, देशात VLC मीडिया प्लेयर ब्लॉक करण्यात आले आहे. कारण या प्लॅटफॉर्मचा वापर चीन समर्थक हॅकिंग ग्रुप सिकाडाने सायबर हल्ल्यांसाठी केला होता. काही महिन्यांपूर्वी सुरक्षा तज्ज्ञांना असे आढळून आले की हॅकिंग ग्रुप Cicada दीर्घकाळ चाललेल्या सायबर हल्ल्याच्या मोहिमेचा भाग म्हणून मालवेअर लोडर तैनात करण्यासाठी VLC Media Player चा वापर करत आहे.
ही सौम्य स्वरुपाची बंदी असल्याने कंपनीने अथवा भारत सरकारने या मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची अधिकृत घोषणा केली नाही. ट्विटरवरील काही यूजर्स अजूनही या प्लॅटफॉर्मवरील बंदीचे कारण शोधत आहेत. गगनदीप सप्रा नावाच्या ट्विटर यूजर्सने VLC वेबसाइटचा एक स्क्रीनशॉट ट्विट केला आहे. ज्यात असे दिसते की "आयटी कायदा, २००० अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानुसार ही वेबसाइट ब्लॉक करण्यात आली आहे."

सध्या, देशात VLC मीडिया प्लेयर वेबसाइट आणि डाउनलोड लिंक ब्लॉक करण्यात आल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की देशातील कोणीही कोणत्याही कामासाठी या प्लॅटफॉर्मवर पोहोचू शकणार नाही. ज्या यूजर्संनी त्यांच्या डिव्हाइसवर सॉफ्टवेअर installed केले आहे. त्यांना ही बाब लक्षात येईल. असे म्हटले जाते की ACTFibernet यासह Jio, Vodafone-idea आणि इतर ISPs वर VLC Media Player ब्लॉक करण्यात आले आहे.

२०२० मध्ये केंद्र सरकारने PUBG Mobile, TikTok, Camscanner यासह शेकडो चिनी अॅप्स ब्लॉक केले होते. BGMI हे डब केलेले PUBG मोबाइलचे भारतीय व्हर्जनदेखील हल्लीच भारतात ब्लॉक करण्यात आले आहे आणि ते Google Play Store आणि Apple App Store वरून काढून टाकण्यात आले आहे. हे अॅप्स ब्लॉक करण्यामागचे कारण म्हणजे हे प्लॅटफॉर्म यूजर्संचा डेटा चीनला पाठवत असल्याची भिती होती. विशेष म्हणजे व्हीएलसी मीडिया प्लेयरला चिनी कंपनीचे नाही. हे पॅरिस येथील VideoLAN या फर्मने विकसित केले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news