Virat Kohli Net Worth : कोहलीची संपत्तीही ‘विराट’, जाणून घ्‍या एकूण संपत्ती

Virat Kohli
Virat Kohli
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याची एकूण संपत्ती १ हजार कोटींपेक्षा अधिक झाली आहे. इन्स्टाग्रामवर २५२ मिलियन फॉलोवर्स असणाऱ्या कोहलीच्या संपत्तीबाबत 'स्टॉक ग्रो'ने खुलासा केला आहे. या अहवालानुसार, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची एकूण संपत्ती १०५० कोटी रुपये झाली आहे. हे जगभरातील सर्व क्रिकेटपटूंशी तुलना करता सर्वाधिक आहे. (Virat Kohli Net Worth)

३४ वर्षीय विराट कोहली हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कॉन्ट्रॅक्टमध्ये 'ए प्लस' कॅटॅगरीमध्ये आहे. विराटला 'बीसीसीआय'कडून वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. याच्याशिवाय  कसोटी क्रिकेटसाठी १५ लाख, वन डेसाठी ६ लाख तर टी २० एक सामना खेळण्यासाठी  ३ लाख रुपय मानधन दिले जाते. (Virat Kohli Net Worth)

जाहिरातींमधून कमावले १७५ कोटी

जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्‍ये लाेकप्रिय असणारा विराट अनेक माेठ्या ब्रँड्सच्‍या जाहिराती करताे.  तो १८ हून अधिक ब्रँड्सचे प्रमाेशन करताे.  प्रत्येक जाहिरात शूटसाठी ताे वर्षाला ७.५० ते १० कोटी रुपये घेतो. या बाबतीत तो बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रात आघाडीवर आहे. अशा जाहिरातींमघून तो वर्षाला सुमारे १७५ कोटी रुपये कमावतो, असे 'स्टॉक ग्रो'ने आपल्‍या अहवालात नमूद केले आहे.  (Virat Kohli Net Worth)

सोशल मीडियाचा बादशहा (Virat Kohli Net Worth)

सोशल मीडियाबद्दल बोलायचे झाले तर कोहली इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी ८.९ कोटी रुपये घेतो. त्याचवेळी, ट्विटरवर ताे एका पोस्टसाठी अडीच कोटी रुपये घेतो. विराटची दोन घरे आहेत. मुंबईतील घराची किंमत ३४ कोटी रुपये आणि गुरुग्राममधील घराची किंमत ८० कोटी रुपये आहे. याशिवाय त्याला कारचाही शौक आहे. ताे तब्‍बल ३१ कोटी रुपयांच्या विविध आलिशान कारचा मालक आहे.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news