no-confidence motion : २०१८ मध्‍येच पंतप्रधान मोदींनी केले होते २०२३ च्‍या ‘अविश्‍वास’ ठरावाचे भाकित ( व्‍हिडीओ )

no-confidence motion : २०१८ मध्‍येच पंतप्रधान मोदींनी केले होते २०२३ च्‍या ‘अविश्‍वास’ ठरावाचे भाकित ( व्‍हिडीओ )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विरोधी पक्षांनी आज (दि.२६) लोकसभेत केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची ( no-confidence motion ) मागणी करणारी नोटीस सादर केली. त्‍याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परवानगी दिली आहे. मी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करेन आणि चर्चेसाठी योग्य वेळ तुम्हाला कळवीन, असे ओम बिर्ला यांनी स्‍पष्‍ट केले आहे. दरम्‍यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्‍येच अविश्‍वास प्रस्तावाला दिलेले उत्तर व्हायरल होत आहे. यामध्‍ये त्‍यांनी विरोधी पक्षांची खिल्‍ली उडवत, "तुम्‍हाला २०२३ मध्‍येही असाच प्रस्‍ताव आणावा लागले," असो भाकित केले होते. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी २०१८ मध्‍ये अविश्‍वास प्रस्‍तावावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्‍या भाषणाचा हा व्‍हिडीओ शेअर केला आहे. तो सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे.

no-confidence motion : २०१८ मध्‍ये काय म्‍हणाले होते पंतप्रधान मोदी ?

२०१८ मध्‍ये लोकसभेत केंद्र सरकारविरोधत अविश्‍वास प्रस्‍ताव मांडण्‍यात आला होता. यावेळी या प्रस्‍तावाला उत्तर देताना मोदी म्‍हणाले होते की, मी तुम्‍हाला शुभेच्‍छा देवू इच्छितो. तुम्‍ही इतकीच तयारी करा की तुम्‍हाला २०२३ मध्‍येही पुन्‍हा अविश्‍वास आणण्‍याची संधी मिळेल. २०१४ मध्‍ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची संख्‍या जवळपास ४०पर्यंत घसरली होती. हा अहंकाराचा परिणाम होता, असेही ते म्‍हणाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर काँग्रेस पक्षाने पुन्‍हा एकदा अविश्‍वास ठराव आणला आहे. त्‍यामुळे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी २०१८ मध्‍ये अविश्‍वास प्रस्‍तावावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्‍या भाषणाचा हा व्‍हिडीओ शेअर केला आहे. हा व्‍हिडिओ व्‍हायरल होत असून, पंतप्रधान मोदींच्‍या भाकिताची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. कारण २०१९ मध्‍ये लोकसभा निवडणुका असल्‍याने पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांना विरोधातच राहण्‍यासाठी शुभेछा देत त्‍यांची खिल्‍ली उडवली होती. २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपने निर्विवाद विजय मिळवला. आता पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्‍यामुळे यंदाच्‍या अविश्‍वास ठरावावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्‍यांच्‍या उत्तराकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news