PM Modi : पीएम मोदींचा फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान | पुढारी

PM Modi : पीएम मोदींचा फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना फ्रान्सच्या लीजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. (PM Modi ) याआधी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रो यांनी पीएम मोदी यांच्या सन्मानासाठी खासगी रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते. (PM Modi )

पंतप्रधान मोदींना मिळालेला सन्मान हा फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान आहे. पीएम मोदी हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. लीजन ऑफ ऑनर जगभरातील निवडक प्रमुख नेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जातो. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला, वेल्सचे तत्कालीन राजकुमार किंग चार्ल्स, जर्मनीचे माजी चान्सलर एंजेला मर्केल, संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव बुट्रोस बुट्रोस-घाली यांची नावे समाविष्ट आहेत.

Back to top button