Vinayak Raut : राज्य शासन पळपुटं, विनायक राऊत यांचे टीकास्त्र

Vinayak Raut
Vinayak Raut

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी उद‌्ध्वस्त झालाय. शेतमालाची झालेली दैना पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे सरकारचे कर्तव्य आहे परंतु ते मात्र पळपुटं आहे, म्हणून ते इतर राज्यातील निवडणूक प्रचारात गुंग असल्याची टीका उबाठा गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली.

इगतपुरी तालुक्यातील वाघेरे, पाडळी, गोंदे, वाडीवऱ्हे आदी गावांतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. भात व बागायती पिकांची अपरिमित हानी झाली असून या भागातील शेतकऱ्यांकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन राहिलेले नाही. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बांधावर आलाेत, मात्र शासन प्रतिनिधी राजकारणात व्यस्त असल्याचा घणाघात खासदार राऊत (Vinayak Raut) यांनी केला.

यावेळी माजी आमदार निर्मला गावित यांनी ही विद्यमान शासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. उध्दव ठाकरे शासनाच्या काळात खऱ्या अर्थाने मदत झाल्याचे शेतकरीदेखील मान्य करतात. महाविकास आघाडीच्या काळातच शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली. आता दोन दिवसांत अवकाळी व गारपिटीने कृषीक्षेत्र उद‌्ध्वस्त झालेय. तेव्हा शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणी (Vinayak Raut)  त्यांनी यावेळी केली.

याप्रसंगी शिवव्याख्याते नितीन बानगुडे-पाटील, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, तालुका उपप्रमुख राजू नाठे, माजी सभापती सोमनाथ जोशी, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठल लंगडे, कचरू पा. डुकरे, मोहन बऱ्हे, साहेबराव धोंगडे, ज्येष्ठनेते रमेश गावित, गोविंद गतीर, अंबादास धोंगडे, विष्णु धांडे, विनायक गतीर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news