ठाणे : तानसा व मोडक सागर धरण ओसंडून वाहण्याच्या मार्गावर; गावांना सतर्कतेचा इशारा

तानसा धरण
तानसा धरण

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्ह्यातील तानसा व मोडक सागर धरणाच्या परिसरात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ही दोन्ही धरणे लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणांच्या तसेच तानसा व वैतरणा नदीच्या परिसराच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची तानसा व मोडक सागर ही दोन धरणे आहेत. तानसा व मोडक सागर धरण ओसंडून वाहण्याची पाताळी ही १२८.६३ मीटर व १६३.१४ टीएचडी इतकी आहे. आज तानसा व मोडक सागर धरणातील पाण्याची पातळी ही १२५.३३ मीटर व १६१.३३ मीटर इतकी झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ही पाणी पातळी पुढील काही दिवसात वाढणार असून ही दोन्ही धरणे ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. यामुळे या दोन्ही धरणाखालील तसेच तानसा व वैतरणा नदीलगतच्या शहापूर, भिवंडी, वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावांना व तेथील ग्रामस्थांनी सावध रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या परिसरातील शासकीय यंत्रणांना सतर्क करण्यात आले असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news