विक्रांत नंतर आता टॅायलेट घोटाळा बाहेर काढणार; संजय राऊत यांचा सूचक इशारा

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : "विक्रांत नंतर आता टॅायलेट घोटाळा बाहेर काढणार" असा सूचक इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलत असताना दिला. जवळपास 100 च्या आसपास हे घोटाळे असतील असा आरोप करत त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी, सत्र न्यायालयानं जे प्रश्न विचारले आहेत त्यांचे काय झाले? असे म्हणत विक्रांतसाठीच्या गोळ्या केलेल्या पैशाबाबत प्रश्न उपस्थित केला.

वैफल्यातून भाजपचे महाविकास आघाडीवर आरोप सुरु आहेत, असं म्हणत यांनी भाजपवर निशाणा साधला. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीला छिद्र पडलंय का? असा सवाल राऊत यांनी किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयानं दिलेल्या अटकपूर्व जामिनावर बोलताना केला.

दरम्यान "कोर्टामधून आम्हाला बरेच काही करता येतं ते आम्ही करू" या भाजप आमदार संजय कुंटे यांच्या वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. "न्यायव्यवस्थेत दिलासा देण्यासाठी विशेष लोक बसले आहेत" अशी टीकादेखील त्यांनी आज केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news