vijay raj : ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणारी रझियाबाई कोण आहे?

vijay raj :  ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणारी रझियाबाई कोण आहे?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आल‍िया भट्ट स्टार आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट बॉक्स ऑफ‍िसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात आल‍ियाने 'गंगूबाई'ची मुख्य भूमिका साकारल्याने जोरदार चर्चा होत आहे. आलियासोबत यातील आणखी एक पात्र सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. ते म्हणजे. ट्रान्सजेंडर रझियाबाई. पंरतु, ही भूमिका अभिनेता विजय राज ( vijay raj ) यांनी साकारली आहे. त्यामुळे जाणून घेऊयात त्याच्याबद्दल…

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट सिनेमा घरात दाखल होताच चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उंचलून घेतला. या चित्रपटातील कथानक, डॉयलॉग, गंगूबाईचा हटके लूक आणि धाडसीपणा या सर्वच गोष्टी धमाकेदार असल्याने चाहत्यांना भावल्या आहेत. या चित्रपटात आलियासोबत बॉलिवूड अभिनेता विजय राज, जिम सर्व आणि अजय देवगण यासारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाला भरभरून प्रतिसाद दिला. चित्रपटाआधी याचा एक धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला होता. ट्रेलर रिलीज होताच या चित्रपटातील एका खास असा कलाकारांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली.

या चित्रपटात आलिया भट्ट म्हणजे, गंगूबाईची स्पर्धक रझियाबाई हिला दाखवण्यात आलं आहे. रझियाबाई चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. ट्रान्सजेंडर रझियाबाईची भूमिका अभिनेता विजय राज ( vijay raj ) यांनी साकारली आहे. ट्रेलरनंतर या भूमिकेविषयी चाहत्यांनी अनेक तर्क-वितर्क लावले. या चित्रपटात रझियाबाई गंगूबाईला धमकवण्याचा प्रयत्न करते असते आणि तिला कामाठीपुरामधून माघार घेण्यास सांगत असते. म्हणजे, रझियाबाई गंगूबाईच्या स्पर्धकाच्या भूमिकेत आहे. चित्रपट रिलीज होताच अलियासोबत विजय राजची देखील जोरदार चर्चा झाली. विजयच्या अभिनयाचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.

याच दरम्यान सोशल मीडियावर चाहत्यांनी ट्रान्सजेंडरची भूमिका विजय राजला न देता एखाद्या ट्रान्सजेंडर व्यक्तीला दिला असती तर चांगले झाले असते असे म्हटले आहे. तर काही चाहत्यांनी 'विजय राज सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची एॅन्ट्री खरोखरच दमदार होती.' असे म्हटले आहे. तर आणखी एका युजर्सने "प्रत्येकाचा अभिनय उत्कृष्ट आहे, परंतु, विजय राज माझ्यासाठी वेगळा आहे. त्याने छान अभिनय केला आहे, प्रत्येक कलाकाराने जबरदस्त काम केले आहे. असे म्हटले आहे.

कोण आहे विजय राज

विजय राज यांचा जन्म ५ जून १९६३ रोजी दिल्लीच्या एका सामान्य कुटुंबात झाला. अभ्यासात रुची नसणारे विजय यांनी किरोडीमल कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलं. पहिल्यांदा त्यानी आर्टिस्ट म्हणून १० वर्ष काम केले. यानंतर त्यांनी NSD मध्ये नाटकाचं पूर्ण शिक्षण केले. १९९८ साली बॉलिवूडमध्ये काम करण्याचं ईच्छा उराशी बाळगून मुंबई पोहोचले आणि तेथूनच त्याचा खडतर प्रवास सुरू झाला.

यानंतर अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी विजय राजचं नाव सुचवलं आणि मग १९९९ मध्ये 'भोपाल एक्सप्रेस' या चित्रपटात त्यांना काम मिळालं. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. एकापैक्षा एक हिट चित्रपटात काम केले. याच दरम्यान 'रघु रोमिओ' चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली आणि या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. यानंतर त्यांनी बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनसोबतचा 'टुकार', 'रन', 'गली बॉय', 'गंग' आणि 'दिल्ली बेली' चित्रपटातील भूमिका खूपच गाजल्या.

याशिवाय विजय राज यांनी अनेक हिंदी, तामीळ आणि मल्याळम अशा चित्रपटात अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रन चित्रपटातील विनोदी भूमिका आणि कोआ बिर्याणीचा सीन आजही चाहत्यांना खळखळून हसायला लावतो. तर धमाल चित्रपटातील त्यांच्या भूमिकावर लाखों मिम्स बनवले गेले आहेत. अभिन्यासोबत विजय एक उत्तम व्हॉईस आर्टिस्टसुद्धा आहेत.

मध्यंतरी अबूधाबी विमानतळावर ड्रग्स प्रकरणी विजय यांना अटक करण्यात आली होती. पण पोलिसांना त्याबाबत कोणताही सबळ पुरावा न आढळल्याने त्यांची या प्रकरणातून सुटका झाली.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news