

कीव्ह; पुढारी ऑनलाईन : रशियन सैन्याने युक्रेनमधील बऱ्याच शहरांवर कब्जा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांना कीव्हमधून बाहेर पडण्यास सांगितले. पण, त्यांनी याला नकार देत. (Russia-Ukraine war) तुम्ही आम्हाला वाहने नकोत तर शस्त्रे पाठवा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. असोसिएटेड प्रेसने याबाबत माहिती दिली आहे.
एका वरिष्ठ यूएस गुप्तचर अधिकार्याचा हवाल्यानुसार त्यांनी माहिती दिली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांनी अमेरिकेची वाहने नाकारली आहेत. ते म्हणाले की, आम्हाला वाहने नकोत शस्त्रे द्या. आमचा लढा इथे सुरू आहे.
आम्ही किव्हमधून बाहेर पडणार नाही. आम्हाला दारूगोळ्याची सध्या गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला पळून जाण्याचा सल्ला अमेरिकेने देऊ नये असेही ते म्हणाले आहेत.
रशिया-युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधात ठराव मांडण्यात आला. यावर सर्व देशांना मतदान करावे लागले. मात्र, भारताने या मतदानातून स्वतःला वगळले. सर्व सदस्य देशांनी मतभेद आणि वाद मिटवण्यासाठी राजकीय प्रयत्न करावेत, असे भारताने म्हटले आहे.
शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या ठरावाच्या बाजूने ११ मते पडली. चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने मतदान केले नाही. हा ठराव सुरक्षा परिषदेत संमत होऊ शकला नाही कारण परिषदेचा स्थायी सदस्य असलेल्या रशियाने त्यावर व्हिटो जारी केला होता. मतदानानंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विट केले की जग आमच्यासोबत आहे, सत्य आमच्यासोबत आहे, विजय आमचा आहे.
रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरु असून यात मोठी जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की मित्रराष्ट्रांकडे मदत मागत आहेत. झेलेन्स्की यांनी नुकतीच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रोन तसेच पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांशी राजनैतिक पातळीवर चर्चा केली. मित्रराष्ट्रांकडून शस्त्रांची मदत येत असून युद्धविरोधी भूमिका कायम असल्याचे त्यांनी झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. यातच मॅक्रॉन यांनी मोठ्या युद्धासाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे.