Raghav Chadha Viral Video : राघव आणि परिणिती एंगेजमेंटनंतर राज्‍यसभेतील ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल

Raghav Chadha Viral Video : राघव आणि परिणिती एंगेजमेंटनंतर राज्‍यसभेतील ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल
Published on
Updated on
पुढारी ऑनलाईन : राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्रा यांचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला. या दोघांनी सुरूवातीला आपल्‍या साखरपुड्याबाबत मौन धारण केले होते. मात्र ही जोडी मागील काही दिवस चर्चेत होती. आता दोघांचा साखरपुडा झाला. यानंतर आता संसद टीव्हीवरील राघव चढ्ढा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्‍यामध्ये त्‍यांना पहिल्‍या प्रेमाची आठवण करून दिली जात आहे.

'राघव प्रेम तर एकदाच होतंय ना?

राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्राचा साखरपुडा झाला आहे. यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महत्‍वाचे म्‍हणजे हा व्हिडिओ संसद सत्राच्या दरम्‍यानचा आहे. राघव चढ्ढा हे संसदेच्या सत्रात कोणालातरी शुभेच्छा देत आहेत. या दरम्‍यान राज्‍यसभा सभापती व्यंकय्या नायडू हे राघव चढ्ढा यांना विचारतात," राघव मला वाटतं प्रेम एकच असतं ना? पहिले प्रेम, दुसरे प्रेम असे असते का? नेहमीच पहिले प्रेम असते, नाही का?"

राघव चढ्ढा यांनी असे दिले उत्तर

राज्‍यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी प्रेमाबद्दल विचारले असता राघव चढ्ढा म्हणाले, 'सर मी या बाबतीत इतका अनुभवी नाही, आयुष्यात इतका अनुभव घेतला नाही; पण हो सर छान असते सर, जेवढे मला लोकांकडून समजले आहे. 

सभापतींनी असा सल्ला दिला

राघव यांच्या उत्तरानंतर सभापती व्यंकय्या नायडू बोलताना दिसून येत आहेत.. 'हो पहिलं प्रेम चांगलं असतं, आयुष्यभर असेच राहते' असं म्हणतात. 

चित्रपटाच्या सेटवर झाले प्रेम

राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्रा यांची लव्हस्टोरीबद्दल सांगायचे तर गेल्या वर्षी परिणीतीच्या एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली. तेव्हापासून ही प्रेमकथा सुरू झाल्याचे मानले जाते. परिणीती पंजाबमध्ये इम्तियाज अलीच्या 'चमकिला' चित्रपटाचे शूटिंग करत होती. सेटवर राघव चढ्ढा मित्र म्हणून परिणितीला भेटण्यासाठी तेथे आले होते. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. त्‍यांनी एकमेकांना समजून घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्‍यांनी लग्‍नाचा निर्णय घेतला.
हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news