Video : पदवी घेतली की वर्ल्डकप… व्हिडीओ पाहून लोक हसून बेजार

Video : पदवी घेतली की वर्ल्डकप… व्हिडीओ पाहून लोक हसून बेजार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येकजण आपल्या पदवीदान समारंभादिवशी आनंदी असतो. हा दिवस प्रत्येकासाठी खूप खास आणि अविस्मरणीय असतो. अशा वेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण उमटलेले असतात. काहींचा आनंद तर त्यांच्या संपूर्ण हालचालींवर दिसून येतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओमधून (Video) असाच एक क्षण एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात आलेला दिसून येतो. या व्हिडिओतील मुलाचा आनंद जर तुम्ही पाहीला तर तुम्ही देखील आश्चर्य कराल की, काहींचा आनंद साजरा करण्याचा असाही अंदाज असू शकतो.

काय आहे व्हिडिओमध्ये?

पदवीदान समारंभादिवशी आनंदाने उड्या मारणाऱ्या विद्यार्थ्याचा आनंद व्यक्त करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत असलेला ताे पाहिल्यानंतर लोक हसून हसून बेजार झाले आहेत. उड्या मारत, नाचत, खिदळत असणाऱ्या मुलाला पाहून त्याचे मित्र आणि शिक्षकही अवाक झालेले दिसून येतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडिओवर मजेदार कमेंट्सचा पाऊस पडताना दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by RVCJ Media (@rvcjinsta)

विद्यार्थ्याच्या सेलिब्रेशनची अनोखी स्टाइल

या मजेशीर व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी त्याच्या हातात ग्रॅज्युएशनची डिग्री फिरवताना दिसत आहे. यावेळी तो उड्या मारत, नाचत आनंद साजरा करत असतो. पण अचानकपणे नाचता नाचता तो खाली पडतो. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच लक्ष त्याच्याकडे वेधलं जातं. त्यानंतर त्याला सावरण्यासाठी काहीजण पुढे येतात.पण यानंतर तो मुलगा काय करतो हे पाहून तिथे उपस्थित सर्वांचीच हशा पिकते.

त्या पडलेल्या मुलाला सावरण्यासाठी काहीजण पुढे सरसावतात येवढ्यात तो लगेचच उठतो आणि पुन्हा नाचू लागतो. कहर म्हणजे उठून नाचत नाचतच अशा काही ग्लॅमरस पोझ देत असतो की त्या पाहण्याजोग्या असतात. त्याच्या डान्सच्या स्टेप्स कोणत्याही टॉप डान्सरला टक्कर देणाऱ्या असतात. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर होताच लोक त्यावर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

नेटकर्‍यांकडून कमेंट्सचा पाऊस

पदवी मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या मुलाचा व्हिडीओ भरपूर व्हायरल होत आहे. त्यावर मजेशीर आणि हटके कमेंट्सचा पाऊस पडत आहे. खाली पडल्यानंतर त्याने स्वत:ला सावरल्यामुळे एका यूजरने कमेंटमध्ये म्हटले आहे की, 'वेल कव्हर भाऊ.' तर दुसऱ्या युजर म्हणतो की, 'अरे देवा, हे काय, हसून हसून पोट दुखत आहे'. एका युजरने तर, डान्सचा असाच एक कॉमेडी व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये लग्नात हटके अंदाजात डान्स करताना काही लोक जमिनीवर पडतात. कॉमेडीने हाऊसफुल असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर युजर्सच्या चांगल्याच पसंतीस उतरला होता.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news