Jayant Sawarkar : जयंत सावरकरांचा रंगमंच्यावरचा थक्क करणारा प्रवास…

Jayant Sawarkar : जयंत सावरकरांचा रंगमंच्यावरचा थक्क करणारा प्रवास…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर ( Jayant Sawarkar ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने सर्व मराठी कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

माहितीनुसार, गेल्या १५ दिवसांपासून जयंत सावरकर ( Jayant Sawarkar ) यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. यानंतर आज सकाळी त्यांचे दुख:त निधन झाले.

अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ रोजी गुहागरमध्ये झाला. त्यांनी एकूण त्यांना २१ भावंडे होती. दररोज सकाळी चार वाजता उठून रोज चरकातून उसाचा हंडाभर रस काढायचा आणि तो चालत जावून विकायचा हा त्यांच्या कुटूंबियांचा दिनक्रम असायचा. सावरकरचा मोठा भाऊ मुंबईत नोकरीस असल्याने ते गिरगावात राहू लागले. तेथेच नोकरी करू लागले.

यानंतर नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी बारा वर्षे 'बॅक स्टेज आर्टिस्ट' म्हणून काम केले. नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहान- लहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. कधी- कधी ते साहित्य संघाच्या दरवाज्यावर उभे राहून ते तिकिटे कापत होते. पहिल्यांदा त्यांना आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित 'किंग लिअर' (सम्राट सिंह) या नाटकात मा. दत्ताराम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी अनेक नाटकात अभिनयाचा ठसा उमठवला.

जयंत सावरकर यांनी शंभराहून अधिक मराठी आणि तीसहून अधिक हिंदी चित्रपटांत कामे केली आहेत. वयाच्या पंचाहत्तरीनंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली. अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या बॉलिवूड कलाकारांसोबतही त्यांनी कामे केली आहेत. 'अपराध मीच केला', 'अपूर्णांक', 'अलीबाबा चाळीस चोर', 'अल्लादीन जादूचा दिवा', 'आम्ही जगतो बेफाम', 'एकच प्याला' अशी अनेक नाटके त्यांची गाजली आहेत. 'एकच प्याला' नाटकातील त्यांची तळीरामांची भूमिका खूपच प्रसिद्धीस आली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news