Priyanka Choudhary : बिग बॉस फेम प्रियांका चहर चौधरीने गुपचूप उरकला साखरपुडा? | पुढारी

Priyanka Choudhary : बिग बॉस फेम प्रियांका चहर चौधरीने गुपचूप उरकला साखरपुडा?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बिग बॉस १६’ फेम टीव्ही अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी ( Priyanka Choudhary ) नवनविन हॉट फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या प्रियांकाच्या हातात एंगेजमेंट रिंग दिसल्याने साखरपुड्याच्या चर्चांना उधान आलं आहे.

अभिनेत्री प्रियांका चाहर चौधरीने ( Priyanka Choudhary ) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत प्रियांकाच्या हातातील मधल्या बोटात एंगेजमेंट रिंग दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तिने तिने अंगठी स्पष्टपणे दाखविली आहे. याशिवाय तिच्या चेहऱ्यावर तेज आहे. या फोटोला तिने माझ्याकडून होकार असल्याचे म्हटलं आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी प्रियांकाने गुपचूप बॉयफ्रेंड अंकित गुप्तासोबत साखरपुडा उरकला आहे अशा अंदाज लावला आहे. मात्र, प्रियांकाने फक्त होणार दिला आहे. खरंच साखरपुडा केला आहे की नाही? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान प्रियांकावर सोशल मीडियावर भरभरून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान विकास मानकटला आणि राजीव अडातियाने प्रियांकाचा बॉयफ्रेंड अंकित गुप्ताचे नाव घेऊन कॉमेन्टस केल्या आहेत. त्यांनी ‘चर्चा बंद करा?’, ‘वरात दारात घेवून येतोय अंकित गुप्ता?’, ‘ही वेळ आहे. मी तुम्हा दोघांशी लग्न करायला तयार आहे.’ असे कॉमेन्टसमध्ये म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांकाचे हे एक फोटोशूट असून तिचा साखरपुडा झाला नसल्याचे समजते.

हेही वाचा : 

Back to top button