मुंबई : मानखुर्दमध्ये जमावाने केली वाहनांची तोडफोड!

मुंबई : मानखुर्दमध्ये जमावाने केली वाहनांची तोडफोड!
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वार्ताहर
मानखुर्दच्या म्हाडा वसाहतीमधील कोयना सोसायटीजवळ ४० ते ४५ अनोळखी तरुणांच्‍या जमावाने  वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि.११) रात्री घडली. तरूणांच्या हातातील तलवार, लाकडी बांबू व ॲल्युमिनियम पाईपमुळे या भागात काही काळ दहशत पसरली हाेती.

म्हाडा वसाहतीमधील कोयना सोसायटीजवळ हातामध्ये असलेल्या तलवार, लाकडी बांबू व ॲल्युमिनियमच्या पाइपने त्यांनी वाहनांची तोडफोड करायला सुरूवात केली. न्यू म्हाडा कॉलनीमधील कोयना बिल्डींग जवळील रस्त्यापासून ते बिल्डींग क्र.१०४ पर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकी व रिक्षा अशा अंदाजे २० ते २५ वाहनांच्या काचेची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर हे तरूण घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेची दखल घेत परिसरातील नागरिकांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . स्थानिक पोलीस या अनोळखी तरुणांचा शोध घेत आहेत. दोन तरुणांच्या आपापसातील वादातून हा प्रकार झाल्‍याचे समजते.

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news