Vari Pandhari : वारी परंपरेस युती सरकारचे पाठबळ, लाखो वारकऱ्यांना होणार फायदा

Vari Pandhari : वारी परंपरेस युती सरकारचे पाठबळ, लाखो वारकऱ्यांना होणार फायदा
Published on
Updated on

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनाकरिता आषाढी वारीद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो विठ्ठलभक्तांकरिता 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना' लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने वारकऱ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेस सुरक्षा कवच दिले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे विठु नामाचा गजर करत वारीतून पंढरपुरास येणाऱ्या भाविक वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना भाजपचे आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांनी गुरुवारी (दि.22)  पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी दिंडी काढून उन-पावसाची तमा न करता केवळ भक्तिच्या बळावर शेकडो मैल चालत पंढरपुरास येतात. या वाटेवर त्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातून आरोग्याच्या समस्याही निर्माण होत असल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा मुद्दा संवेदनशीलतने लक्षात घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने लागू केलेल्या विमा सुरक्षा योजनेमुळे आता वारकरी भाविकांच्या यात्रेस सरकारी सुरक्षा छत्र लाभले आहे. केवळ विठ्ठलभक्तीच्या बळावर चालणाऱ्या या पावलांची सुरक्षा सरकारने निर्भर केल्यामुळे वारीला सरकारी संरक्षणाचे कवच मिळाले आहे. – डॉ. राहुल दौलतराव आहेर, आमदार.

अपघात झाल्यास मिळणार सानुग्रह अनुदान ...

पंढरीच्या वाटेवर चालत असताना एक महिन्याच्या कालावधीत दुर्दैवाने कोणा भाविकाचा दुर्दैवी मृत्यू ओढवल्यास या योजनेतून त्याच्या पश्चात वारसांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाईल. अपघातासारख्या अनपेक्षित घटनांत कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपये तर अंशिक अपंगत्व आल्यास पन्नास हजारांचे अनुदान दिले जाईल. वारीच्या दरम्यान वारकऱ्यास आजारपण आल्यास वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची जबाबदारीही सरकारने घेतली असून त्याकरिता ३५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

वारकरी भाविकांनी वारीसारख्या अनोख्या भक्तिपरंपरेतून जपलेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचा शेकडो वर्षांचा वारसा जोपासण्याकरिता भाजप-शिवसेना युती सरकारने दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे पुढच्या पिढ्यांतील या परंपरेचे पाईक अधिक जोमाने पुढे येतील, असा विश्वास आमदार डॉ.राहुल आहेर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या या भक्तिपरंपरेला पाठबळ देऊन सरकारने राज्याच्या सांस्कृतिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या या निर्णयाची प्रशंसा केली. यावेळी अशोक व्यवहारे, डॉ.नितीन गांगुर्डे, तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, बाळासाहेब माळी, विलास ढोमसे, विजय धाकराव, योगेश ढोमसे, गणपत ठाकरे, काका काळे, प्रशांत ठाकरे, सुनील शेलार, वाल्मिक पवार, डॉ.भावराव देवरे, अंबादास ठोंबरे, मनोज किरकाडे, मन्सूरभाई मुलाणी, देवीदास आहेर, संजय पाचोरकर, डॉ.सुनील सोनवणे, वर्धमान पांडे, संजय क्षत्रिय, संजय पाडवी, विशाल ललवाणी, गोरख ढगे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news