Vande Bharat Express : पीएम मोदी यांच्या हस्ते ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला हिरवा झेंडा

Vande Bharat Express : पीएम मोदी यांच्या हस्ते ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला हिरवा झेंडा
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण करताना मला खूप आनंद होत आहे, अशी मराठीतून आपल्या भाषणाला सुरूवात करत रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशातील नववी आणि दहावी ट्रेन सुरू होत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या ट्रेनमुळे पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी, सोलापुरचे सिध्देश्वर, शिर्डीचे साईबाबा, तुळजापूरची तुळजा भवानीचे दर्शन भक्तांसाठी सुलभ होणार आहे. तसेच पर्यटनाला चालना मिळणार आहे. या ट्रेनमुळे देशातील १७ राज्यातील १०८ जिल्हे जोडले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले. पीएम मोदी यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरून 'वंदे भारत' एक्सप्रेसला आज (दि.10) (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

याप्रसंगी वाकोला ते कुर्ला आणि सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरील एमटीएनएल जंक्शन ते एलबीएस फ्लायओव्हर आणि मालाडमधील कुरार व्हिलेजमधील वाहनांसाठी दोन अंडरपासचे देखील लोकार्पण करण्यात आले.

नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे जाहीर झाले आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. पंतप्रधानांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते, त्यानंतर मुंबईत मेट्रोची त्यांनी सुरुवात केली आणि आता वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. अशाच रीतीने एमटीएचएल, मेट्रोचे इतर मार्ग, मुंबई ते पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्पही लवकरच सुरू होतील आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित केले जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सिंचन, रस्ते प्रकल्प कृषी इन्फ्रा, गृहनिर्माण, स्टार्टअप, महाराष्ट्र सर्व क्षेत्रात या केंद्रीय अर्थसंकल्पातून खूप काही मिळाले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा जो निर्धार पंतप्रधानांनी केला आहे. त्यात महाराष्ट्रही आपले एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी कठोर प्रयत्न करेल.

आजच्या कार्यक्रमास केंद्रीय सुक्ष्म लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते.

देशातील 9व्या वंदे भारत एक्सप्रेसची (Vande Bharat Express) सेवा शनिवारपासून (दि.11) सुरू होणार आहे. सेमी हायस्पीड ट्रेन मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणार आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि सोलापूर दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवेल. ४५५ किमी अंतर ६ तास ३५ मिनिटांत कापणार आहे.

प्रवासादरम्यान ही गाडी दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथे थांबेल. सीएसएमटीहून बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस आणि सोलापूरहून गुरुवारी ही गाडी धावणार आहे. ट्रेनला 16 डबे असतील. ही ट्रेन सरासरी ६९.१५ ते ७० किमी/तास वेगाने धावेल.
तिकीट बुकिंग

22225/22226 मुंबई सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. या निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ट्रेनचे तिकीट पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (पीआरएस) आणि इंटरनेटद्वारे खरेदी करता येईल.

22225 सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे खालील प्रमाणे –

AC चेअर कार (CC) भाडे:

सीएसएमटी ते सोलापूर – रु 1300
सीएसएमटी ते दादर – रु. 365
सीएसएमटी ते कल्याण जंक्शन – रु. 485
सीएसएमटी ते पुणे जंक्शन – रु. 660
सीएसएमटी ते कुर्डुवाडी – रु. 1,175
एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) भाडे:-

सीएसएमटी ते सोलापूर – रु. 2,365
सीएसएमटी ते दादर – रु. 690
सीएसएमटी ते कल्याण जंक्शन – रु. ९०५
सीएसएमटी ते पुणे जंक्शन – रु. 1,270
सीएसएमटी ते कुर्डुवाडी – रु. 2,110
22226 सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे पाहू:

एसी चेअर कार (सीसी) भाडे:-

सोलापूर ते सीएसएमटी – रु. 1,150
सोलापूर ते कुर्डुवाडी – ४४० रु
सोलापूर ते पुणे जंक्शन – रु 845
सोलापूर ते कल्याण जंक्शन – रु. 1,075
सोलापूर ते दादर – रु. 1,130
एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) भाडे:-

सोलापूर ते सीएसएमटी – रु. 2,185
सोलापूर ते कुर्डुवाडी – रु 835
सोलापूर ते पुणे जंक्शन – रु. 1,575
सोलापूर ते कल्याण जंक्शन – रु. 2,025
सोलापूर ते दादर – रु. 2,145

Vande Bharat Express : मुंबई ते शिर्डी 'वंदे भारत एक्सप्रेस' ट्रेन शनिवारपासून धावणार

भारताच्या 10व्या वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा शनिवारीपासून ( दि.11) पासून सुरू होणार आहे. निळ्या आणि पांढऱ्या रंगाची ट्रेन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते साईनगर शिर्डी या मार्गावर धावणार आहे. ही ट्रेन दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. ही ट्रेन मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. ही ट्रेन 16 डब्यांची असून सरासरी 64.35 किमी/तास वेगाने धावेल.

तिकीट बुकिंग

22223/22224 मुंबई सीएसएमटी ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे आरक्षण सुरू झाले आहे. देशभरातील कोणत्याही तिकीट बुकिंग काउंटरवरून किंवा IRCTC द्वारे तिकीट बुक केले जाऊ शकते.

22223 मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे पाहूया –

AC चेअर कार (CC) भाडे:

सीएसएमटी ते साईनगर शिर्डी – रु. 975
सीएसएमटी ते दादर – रु. 365
सीएसएमटी ते ठाणे – रु. 365
सीएसएमटी ते नाशिकरोड – रु. 720
एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) भाडे:-

सीएसएमटी ते साईनगर शिर्डी – रु. 1,840
सीएसएमटी ते दादर – रु. 690
सीएसएमटी ते ठाणे – 690 रु
सीएसएमटी ते नाशिकरोड – रु. 1,315
22224 साईनगर शिर्डी-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे पाहूया –

AC चेअर कार (CC) भाडे:

साईनगर शिर्डी ते सीएसएमटी – रु 1,130
साईनगर शिर्डी ते नाशिकरोड – ६०० रु
साईनगर शिर्डी ते ठाणे – रु. 1,065
साईनगर शिर्डी ते दादर – रु. 1,120
एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) भाडे:-

साईनगर शिर्डी ते सीएसएमटी – रु. 2,020
साईनगर शिर्डी ते नाशिक रोड – रु. 1,145
साईनगर शिर्डी ते ठाणे – रु. 1,890
साईनगर शिर्डी ते दादर – रु. 1,985

केटरिंग शुल्क:

या ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ मिळणार आहेत. तथापि, जर कोणी नो फूडचा पर्याय निवडला असेल, तर कॅटरिंग शुल्क भाड्यातून वजा केले जाणार आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news