छटा नव्हे, अतिनील किरणांच्या तरंग लांबी ; सूर्याविषयी नवी माहिती

छटा नव्हे, अतिनील किरणांच्या तरंग लांबी ; सूर्याविषयी नवी माहिती

पुणे : सूर्याचा अभ्यास करणा-या आदित्य एल-1 यानाने सूर्याच्या विविध रंगांतील छटा प्रसारित केल्या, या छटा अकरा ते बारा रंगांच्या आहेत. मात्र, या सर्व रंगांच्या छटा आभासी असून, ते रंग अतिनील किरणांची तरंग लांबी ओळखण्यासाठी दिल्या आहेत.सूर्य धगधत्या अग्नीकुंडा प्रमाणेच असून त्याचीही छायाचित्रे यानाने टिपली आहेत, अशी माहिती पेलोड तयार करणा-या आयुकातील शास्त्रज्ञांनी दिली. आदित्य एल-1 या यानाने सूर्याची अकरा ते बारा छायाचित्रे प्रसारित केली. सूर्याच्या या विविध छटा म्हणजे नेमके काय याची माहिती समजून घेतली असता शास्त्रज्ञांनी सांगितले की, हे रंग आभासी आहेत. सूर्यावर कुठे किती प्रमाणावर अतिनील किरणांची तीव्रता आहे. हे विविध प्रकारच्या वारंवारिता यानाने टिपल्या आहेत. त्या वारंंवारता सहजपणे ओळखता याव्यात म्हणून लाल, पिवळा, गुलाबी असे एकूण बारा रंग दिले आहेत.

संबंधित बातम्या :

आदित्यने अंतराळ यानावर असलेल्या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने मिशनमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून ओळखल्या जाणा-या पहिल्या प्रकाश प्रतिमा यशस्वीपणे टिपल्या.

सुर्याचा रंग धगधगत्या अग्नीकुंडासारखाच आहे.त्या छटाही यानाने टिपल्या आहेत. या विविध रंगी छटा सुर्यावरील उष्ण व थंड सौर वार्यांच्या वारंवारता टिपण्यासाठी तयार केलेल्या आहेत.त्यावरुन रेडिओ, मायक्रोव्हेव, अतिनिल किरणे, एक्स-रे यांचा अंदाज काढला जात आहे.
                – डॉ. भास बापट, शास्त्रज्ञ आयसर पुणे (आदित्य यानात सहभागी)

 सूर्याची जी रंगीत छायाचित्रे तुम्ही पाहिली ते रंग आभासी आहेत. अतिनील किरणांच्या वारंवारता सहज समजाव्यात म्हणून हे आभासी रंग देण्यात आले.
                                    – समीर धुरडे, जनसंपर्क अधिकारी, आयुका, पुणे

सूर्याच्या लपलेल्या थरांचे केले अनावरण
आदित्य यानाने 200 ते 400 नॅनो मिटर इतक्या लांबीच्या अतिनील किरणांच्या तरंगलांबी यातून दाखवल्या आहेत. 11 विशेष प्रकाश फिल्टरसह ही छायाचित्रे टिपली.सूर्याच्या फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियर या थरांच्या प्रतिमा आहेत. सूर्याच्या वातावरणातील गुंतागुंत सुटणार या पेलोडचे मुख्य समन्वयक दुर्गेश त्रिपाठी म्हणाले, क्लिष्ट स्पेस टेलिस्कोप पेलोडची कल्पना आणणे आणि नंतर प्रथम प्रकाश निरीक्षणे पाहणे ही वैज्ञानिकासाठी संधी आहे. तरंगलांबीच्या या संयोगातील संपूर्ण डिस्क प्रतिमा प्रथमच अंतराळ दुर्बिणीद्वारे घेतल्या जात आहेत. ते खालच्या आणि मध्यम सौरवातावरणातील वैशिष्ट्यांचे गुंतागुंतीचे तपशील दाखवतात. पेलोडने घेतलेल्या माहितीमुळे सूर्यावरील गूढ माहिती जगासमोर येण्यास मदत होईल.

निरीक्षणे नोंदविण्यासाठी उपकरणाची निर्मिती
पेलोडचे मुख्य व्यवस्थापक प्रा. ए. एन. रामप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक नवीन निरीक्षण क्षमता आणण्यासाठी या उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. हे खगोलशास्त्रज्ञांना सूर्याविषयी तसेच पृथ्वीवरील त्याच्या प्रभावाबद्दलच्या अनेक प्रदीर्घ प्रश्नांचा अभ्यास करण्यास मदत करेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news