Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशीतील ४१ कामगारांच्या बचावासाठी आता ‘मॅन्युअल व्हर्टिकल ड्रिलिंग’

Uttarkashi Tunnel rescue operation
Uttarkashi Tunnel rescue operation

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात ४१ कामगार अडकले आहेत. कामगारांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून बचावकार्य राबवले जात आहे. दरम्यान परदेशी ऑगर ड्रिलिंग मशीन बचाव कार्यात अपयशी ठरल्यानंतर 'व्हर्टिकल ड्रिलिंग' ला सुरूवात करण्यात येणार आहे. यासाठी मॅन्युअल ड्रिलिंगचा मार्ग अवलंबण्यात येणार आहे असे बचावकार्यातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, असे वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे.  (Uttarkashi Tunnel Rescue)

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. यासाठी बचाव कार्यातील अधिकाऱ्यांनी सिल्क्यरा बोगद्याच्या वरच्या टेकडीवर उभ्या ड्रिलिंगला सुरुवात केली आहे. अमेरिकन-ऑगर मशीन मेटल गर्डरला आदळल्यानंतर शुक्रवारी (दि.२४) बचाव कार्यात अडथळा आला होता. त्यानंतर काही वेळाने पुन्हा काम सुरू झाले मात्र शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा ऑगर ड्रिलिंग मशीन खराब झाल्याने पुन्हा बचाव कार्य स्थगित करण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी बोगद्याच्या 'व्हर्टिकल ड्रिलिंग'ला पर्याय वापरण्याचे ठरवले. यानुसार आज या कामाला सुरूवात होईल, असेही इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे. (Uttarkashi Tunnel Rescue)

कामगारांच्या बचावासाठी आता 'व्हर्टिकल ड्रिलिंग': पाहा व्हिडिओ

Uttarkashi Tunnel Rescue: ऑगर बोगद्यातून काढण्यासाठी प्लाझ्मा मशीन

बोगदाकाम तज्ज्ञ ख्रिस कूपर यांनी एएनआयला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, शुक्रवारी (दि.२४) बचावकार्यादरम्यान अमेरिकन-ऑगर ड्रिलिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते आदळले. हे मशीन बोगद्यातच अडकले असून, त्याचे पार्ट अजूनही बाहेर काढण्यात येत आहेत. दरम्यान ऑगर मशीन कापून बाहेर काढण्यासाठी आता नवीन प्लाझ्मा मशीन वापरण्यात येत आहे. अजून १६ मीटर ऑगर मशीन आत बोगद्यात आहे. प्लाझ्मा मशीन जास्त वेगाने स्टील कापते, त्यामुळे ऑगर ड्रिलिंग मशीन कापण्यासाठी आता प्लाझ्मा मशीनचा वापर कऱण्यात येत असल्याचे कूपर यांनी म्हटले आहे. (Uttarkashi Tunnel Rescue)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news