Pushkar Singh Dhami : उत्तराखंड – पुष्कर सिंह धामी यांनी वाचवली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची; पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी

Pushkar Singh Dhami : उत्तराखंड – पुष्कर सिंह धामी यांनी वाचवली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची; पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी
Published on
Updated on

डेहराडून; पुढारी ऑनलाईन

उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी चंपावत (Champawat constituency) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी विक्रमी ५४,१२१ मतांनी काँग्रेस उमेदवार निर्मला गहतोडी यांचा पराभव केला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस उमेदवार अनामत रक्कम वाचवू शकलेल्या नाहीत. या विजयाने पुष्कर सिंह धामी यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवली आहे. सलग दुसऱ्यांदा भाजपला सत्तेत आणण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पुष्कर धामी यांनी या विजयानंतर स्वतःला उत्तराखंडमधील फायर ब्रँड नेते म्हणून सिद्ध केले आहे. तसेच या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी धामी यांचे अभिनंदन केले आहे.

१३ व्या फेरीतील एकूण मतमोजणीनंतर पुष्कर सिंह धामी यांना एकूण ५७,२६८ मते मिळाली आहेत. तर काँग्रेस उमेदवार निर्मला गहतोडी यांना ३,१४७ मते मिळाली आहेत. त्या अनामत रक्कम वाचवू शकलेल्या नाहीत. सपाचे उमेदवार मनोज कुमार यांनी ४०९ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार हिमांशू गरकोटी यांना ३९९ मते आणि नोटा मते ३७२ आहेत.

या निवडणुकीत पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. याआधी हा विक्रमी माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्या नावावर होता. त्यांनी २०१२ मध्ये सितारगंजमधील पोटनिवडणुकीत प्रकाश पंत यांचा ३९,९५४ मतांनी पराभव केला होता.

तीन मुख्यमंत्री बदलावे लागले

२०१७ ते २०२२ दरम्यान उत्तराखंडमध्ये भाजपला तीन मुख्यमंत्री बदलावे लागले. त्यानंतर धामी यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला होता. धामी यांचा याआधी खटीमा येथून काँग्रेस उमेदवार भुवन चंद्र कापडी यांनी ५,८०० मतांनी पराभव केला होता. खटीमा येथील पराभवानंतरही भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी धामी यांच्याकडे राज्याची कमान सोपवली होती.

योगी यांनी केला होता प्रचार

चंपायत मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकलेले भाजपचे आमदार कैलाश गहतोडी यांनी धामी यांच्यासाठी जागा सोडली होती. काँग्रेसने धामी यांच्या विरोधात निर्मला गहतोडी यांना मैदानात उतरवले होते. मुख्यमंत्री धामी यांच्या विजयासाठी भाजपने मोठी ताकद लावली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धामी यांच्यासाठी प्रचार केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news