पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज विधानसभेत "समान नागरी संहिता 2024" (Uniform Civil Code Uttarakhand 2024) विधेयक सादर केले. विधेयकावर चर्चेची मागणी करत विधानसभेत गदारोळ झाला. दरम्यान, विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
उत्तराखंड विधानसभेच्या अधिवेशनाचा मंगळवारी दुसरा दिवस आहे. राज्याच्या धामी सरकारने विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर केले. समान नागरी संहिता (Uniform Civil Code Uttarakhand 2024) जात आणि धर्माचा विचार न करता राज्यातील सर्व समुदायांसाठी समान नागरी कायदे प्रस्तावित करते. मंजूर झाल्यास, हे राज्याच्या नागरिकांसाठी एकसमान लग्न, घटस्फोट, जमीन, मालमत्ता आणि वारसा कायद्यांसाठी कायदेशीर चौकट प्रदान करेल.
हेही वाचा :