पंतप्रधान मोदींनी जिथे संकल्‍प केला तिथेच मंदिर बांधलं : योगी आदित्‍यनाथ

योगी आदित्‍यनाथ
योगी आदित्‍यनाथ

अयोध्या : पुढारी ऑनलाईन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्‍थितीत अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्‍लांची प्राणप्रतिष्‍ठा करण्यात आली. यावेळी उत्‍तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी उपस्‍थितांना संबोधित केले. तब्‍बल ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आलेल्‍या या क्षणामुळे मन भावूक आणि आनंदीत आहे. आज देशातील प्रत्‍येक नागरिकांची हीच भावना आहे. आज देशाच्या प्रत्‍येक कानाकोपऱ्यातून प्रत्‍येक घरातून भाविक अयोध्येच्या दिशेने येत आहेत. सर्वांना प्रभू राम लल्‍लांचे दर्शन घ्‍यायचे आहे.

यावेळी योगी आदित्‍यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्‍या. देशातील सर्व भाविकांना त्‍यांनी या सोहळ्‍याच्या शुभेच्छा दिल्‍या. आज देशातील प्रत्‍येक नागरिक आनंदीत आहे. देशभरात आज उत्‍साहाचं वातावरण आहे. आज त्रेतायुग अवतरल्‍याचा भास होत असल्‍याची भावना यावेळी योगी आदित्‍यनाथ यांनी व्यक्‍त केली.

रामलल्‍ला जन्म स्‍थळावर मंदिर होण्यासाठी अनेक पिढ्यांनी वाट पाहिली. भाविकांनी अनेक वर्षांपासून संयम ठेवला. भारतीयांना या दिवसाची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती, पण आजची पिढी भाग्‍यवान आहे, जी या सोहळ्याची साक्षीदार होत आहे.

शिल्‍पकार अरूण योगीराज यांनी भगवान रामलल्‍लांची मनमोहक मूर्ती साकारली. याबद्दल बोलताना योगी आदिल्‍यनाथ यांनी शिल्‍पकार अरूण योगीराज यांचं कौतूक केलं. शिल्‍पकारानं सर्वांच्या मनातली मूर्ती साकारल्‍याची भावना याेगी आदित्‍यनाथ यांनी व्यक्‍त केली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news