Ayodhya Ram Mandir : PM मोदींनी ११ दिवसांचे अनुष्ठान सोडले | पुढारी

 Ayodhya Ram Mandir : PM मोदींनी ११ दिवसांचे अनुष्ठान सोडले

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्‍येतील राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्‍ज झाला होता. राम मंदिराचे उद्घाटन आज ( दि. २२)  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते झाले. यादरम्यान रामलल्‍लामूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, या सोहळ्यासाठी देश-विदेशातील 11 हजारांहून अधिक व्‍हीआयपींना (अति महत्वपूर्ण व्यक्ती) आमंत्रण देण्‍यात आले आहे. दरम्यान, पीएम मोदी हे रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधीच्या 11 दिवस आधीपासून धार्मिक अनुष्ठान करत होते. ( Ayodhya Ram Mandir ) अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकनंतर पंतप्रधान मोदींनी स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या हातून चरणामृत घेऊन 11 दिवसांचे अनुष्ठान पूर्ण केले.

 Ayodhya Ram Mandir : 11 दिवस कठोर अनुष्ठान…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या धार्मिक अनुष्ठानाला १२ जानेवारी रोजी सुरुवात झाली होती.अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी पंतप्रधान मोदी जमिनीवरच झोप घेत होते. तसेच ते 11 दिवसांच्या अनुष्ठानादरम्यान ते फक्त नारळ पाण्याचे सेवन करत होते. ते अष्टांग योगातील यम-नियमांचे पालन करून अनुष्ठान करत आहेत, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले होते. प्राणप्रतिष्ठा हे देवतेच्या मूर्तीमध्ये दैवी चेतनेचे प्रकटीकरण म्हणून वर्णन केले आहे. पवित्र शास्त्रात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी उपवास करण्याच्या नियमांसाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 दिवस कठोर अनुष्ठान करण्यासोबतच उपवास करण्याचा निर्णय घेतला होता. असे सूत्रांनी म्‍हटलं होते. (Ayodhya Ram mandir Pran Pratishtha)

यम -नियमाचा अर्थ खूप व्यापक आहे. यम म्हणजे संयम आणि नियम म्हणजे शिस्त जो अष्टांग योगाचा एक भाग आहे. योगाचे मूळ ध्येय म्हणजे समाधीपर्यंत पोहोचणे म्हणजेच ब्रह्मामध्ये विलीन होणे. ध्यान म्हणजे पाहणे म्हणजेच ब्रह्माशी एकाग्र होणे आणि ब्रह्माचे चिंतन करणे. त्याचा दुसरा भाग म्हणजे भजन अर्थात ईश्वराची उपासना करणे. तसेच, अष्टांग योगाचे आठ भागांमध्‍ये  यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीचा समावेश आहे.

हेही वाचा :

Back to top button