Goa Election : मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर बंडखोरीच्या पावित्र्यात

Goa Election : मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर बंडखोरीच्या पावित्र्यात

Goa Election : मला आगामी विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर लढवायची आहे. असे आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे. त्यामुळे मला उमेदवारी मिळेल याची खात्री आहे. मात्र तसे झाले नाही तर मला कठोर निर्णय घ्यावे लागतील. असा इशारा मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी आज गुरुवार (दि.१८) रोजी दिला.

goa election : वाढदिवसादिवशी शक्तीप्रदर्शन

माजी मुख्यमंत्री तसेच माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र असलेले उत्पल पर्रीकर यांनी आज आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून पणजीत शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.

सुमारे शंभर ते दीडशेच्या आसपास नागरिक उत्पल यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.

यामध्ये माजी नगरसेविका शुभदा धोंड, भाजपचे ताळगावमधील नेते दत्तप्रसाद नाईक, मनोहर पर्रीकर यांचे भाऊ ज्येष्ठ अवधूत पर्रीकर, मळा येथील सुरज कांदे आदींचा समावेश होता.

उत्पल पर्रीकर यांचे महालक्ष्मीला साकडे

उत्पल पर्रीकर यांनी सकाळी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.

यावेळी जमा झालेल्या समर्थकांसह उत्पल यांनी पत्रकारांना संबोधीत केले.

त्यानंतर बांबोळी येथील रुग्णाशय या संस्थेला दोन व्हील चेअर्स प्रदान केल्या.

माझ्या वडिलांना राजकारणात येण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. माझ्याही पाठीशी संघर्ष करावा लागू शकतो.

मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना येत्या निवडणुकीत पणजीची उमेदवारी हवी असे सांगितले आहे.

भाजपची उमेदवारी मलाच मिळेल

मला विश्वास आहे की भाजपची उमेदवारी मलाच मिळेल. नाही मिळाली तर मी कठोर निर्णय घेणार असल्याचे उत्पल म्हणाले. हे कठीण निर्णय घेण्यासाठी मला शक्ती मिळावी अशी मागणी मी श्री महालक्ष्मीकडे केली आहे.

मी हा निर्णय भाजपमध्ये राहूनच घेणार असल्याचेही ते म्हणाले.

गोव्यातील प्रत्येक गावात मनोहर पर्रीकरांना माणनारे कार्यकर्ते आहेत. असे उत्पल पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news