Death of two children : बुलडाणा : खदानीतील पाण्यात पडून दोन बालकांचा दुर्दैवी अंत | पुढारी

Death of two children : बुलडाणा : खदानीतील पाण्यात पडून दोन बालकांचा दुर्दैवी अंत

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा :

सायकल घेऊन खेळायला गेलेल्या तीन व साडेचार वर्षीय दोन बालकांचा घराजवळ असणाऱ्या खदानीच्या पाण्यात पडून दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर मेहकर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. (Death of two children)

मेहकरच्या इकरामनगरातील शे. अन्सार, शे. छोटू यांचेकडे दोन दिवसांपूर्वी पातूर (जि. अकोला) येथून साडेचार वर्षीय मुजैफ व घरकुल परिसरातील शराफतखान यांचा तीन वर्षाचा मुलगा असदखान हे आपल्या आईसोबत सुट्टीसाठी आले होते.

ही दोन्ही बालके छोटी सायकल घेऊन आज सकाळी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. ती आसपास खेळत असावीत असे त्यांच्या कुटुंबियांना वाटले. परंतू ते दोघेही दुपारपर्यंत घरी न परतल्याने, काळजीत पडलेल्या कुटूंबियांनी व शेजा-यांनी शहर परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. (Death of two children)

दरम्यान खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिलांना पाण्यावर दोन बालकांचे शव तरंगत असल्याचे दिसले. त्यानंतर दोन्ही मुलांची शहनिशा केली असता, सकाळपासून शोध घेत असलेली तीच मुले असल्याचे निष्पन्न झाले.

दोन्ही बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती कळताच या परिसरातून हळहळ व्यक्त केली जात होती.

हे ही वाचलं का ?

Back to top button