Food : चविष्ट इडली-डोसा-उत्तप्पा आणि आप्पे बनवण्यासाठी या प्रमाणात साहित्य वापरा

Food : चविष्ट इडली-डोसा-उत्तप्पा आणि आप्पे बनवण्यासाठी या प्रमाणात साहित्य वापरा

पुढारी ऑनलाइन डेस्क : Food  इडली-डोसा-उत्तप्पा आणि आप्पे हे तसं पाहिलं तर सर्व दाक्षिणात्य पदार्थ पण आज जवळपास सर्वच घरात आठवड्यातून एकदा तरी नाश्त्यासाठी हे पदार्थ हमखास बनवले जातात. कारण गृहिणींसाठी हे सर्व पदार्थ झटपट होणारे असतात. त्यामुळे गृहिणींसाठी हे पदार्थ म्हणजे नाश्त्यासाठी 'आज काय बनवू?' या प्रश्नाचं साधं आणि सोपं उत्तर आहे.

Food :  असं असलं तरी हे सर्व पदार्थ असे आहेत ज्याच्या प्रमाणाचं गणित थोडे जरी चुकले की हे पदार्थ बिघडतात आणि घाई गडबडीत चुकून कधीतरी असे घडतेच. बनवताना हे प्रमाण बिघडते. किंवा विशेष करून नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी सुद्धा या इडली-डोसा-उत्तपा आणि आप्पे यांचं योग्य प्रमाणाचा अंदाज लावणं खूपच अवघड होतं. त्यामुळे सकाळचा नाश्ता बिघडतो आणि नवीन विवाहितांसाठी तर सकाळचा नाश्ता बिघडला म्हणजे घरात रामायण घडेल अशी परिस्थिती.

तर दुसरीकडे बदलत्या काळानुसार पुरुषांना देखिल घरची जबाबदारी अनेक कारणास्तव उचलावी लागते. अशा वेळी त्यांना घरात स्वयंपाक करावा लागतो. तेव्हा त्यांना करण्यासाठी सर्वात सोपे पदार्थ म्हणजे इडली, डोसा, उत्तप्पा आणि आप्पे. त्यामुळे याचं पीठ तयार करण्यासाठी जे अचूक प्रमाण लागतं ते आज आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. त्यामुळे एकदा या प्रमाणात पीठ तयार करून पाहा.

Food : खाली दिलेले साहित्य आदल्या दिवशी किमान ३-४ तास आगोददार भिजत घालून रात्री वाटून घेऊन एकत्र करून उबदार जागी झाकून ठेवावे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पदार्थ करणे.

चटणीसाठी साहित्य

एका ओल्या नारळाचा खोवलेला चव,१" (इंच) आल्याचा तुकडा,२ बुटुके चिंच,चवीपुरते मीठ,एक टेबलस्पून पंढरपूरी डाळं,७-८ कढीपत्त्याची पाने,अर्धा चिरलेला कांदा,१" आंबेहळदीचा तुकडा (ऐच्छिक/उपलब्ध असेल तर)
फोडणीसाठी : डावभर तेल,हिंग,मोहरी,जिरे,७-८ कढीपत्त्याची पाने,चमचाभर उडदाची व मुगाची डाळ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news