Idli recipe : मऊ आणि स्पंजी इडली कशी कराल?  | पुढारी

Idli recipe : मऊ आणि स्पंजी इडली कशी कराल? 

पुढारी ऑनलाईन डेस्क : इडली हा पदार्थ दाक्षिणात्य असला तरी, आता सर्रास सर्व ठिकाणी इडली या पदार्थाला प्रथम पसंती मिळते आहे. सकाळचा नाष्ता असो की, दुपारचं जेवण, नाहीतर संध्याकाळी नाष्ता असो कोणत्याही वेळी इडली खाता येते. त्यामुळे इडलीची लोकप्रियता वाढते आहे. तर आज आपण मऊ आणि स्पंजी इडली (Idli recipe) कशी करायची, याची माहिती घेऊ…

साहित्य 

१) दोन कप उडीद डाळ

२) चार कप इडलीचे तांदूळ

३) एक चमचा मीठ

४) पाणी

५) तेल

टीप : तुम्ही एक कप उडीद डाळ आणि एक कप मूग डाळदेखील घेऊ शकता.

कृती 

१) प्रथम उडीदाची डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवावे. आणि वेगवेगळ्या भांड्यात ते दोन्हीही भिजत ठेवावे.

२) तांदूळ आणि डाळ सात ते आठ तास पाण्यात भिजत ठेवावे. अर्थात दिवसभर भिजत ठेवले तरी चालते.

३) रात्री झोपताना दोन्ही वेगवेगळे मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. नंतर एका भांड्यात दोन्हीही एकत्र करून पुन्हा ते मिश्रण १०-१२ तासांसाठी आंबविण्यासाठी ठेवावे.

४) सकाळी त्यामध्ये एक चमचा मीठ घालावे. नंतर इडलीच्या साच्यांना तेल लावून इडलीचे मिश्रण भरावे.

५) त्यानंतर इडलीच्या मोठ्या भांड्यात पाणी ठेवून त्यात मिश्रण भरलेले साचे घालावेत. आणि ते भांडे गॅसवर ठेवावे.

६) साधारणपणे १५-२० मिनिटं इटली वाफलून घ्यावी. त्यानंतर इटलीचे भांडे थंड झाले की, एका चमच्याच्या साह्याने इटली काढून घ्यावेत.

७) अशाप्रकारे तुमची गरमा गरम स्पंजी आणि इटली (Idli recipe) तयार झाली आहे. ओल्या खोबऱ्याची चटणी आणि सांबारसोबत तुम्ही या स्वादिष्ट इडलीचा आनंद घेऊ शकता.

पहा व्हिडीओ : बाप्पाचे प्रिय उकडीचे मोदक कसे कराल? 

या रेसिपी करून पाहिल्या का? 

Back to top button