Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या, अमेरिकेच्या आणखी एका राज्याने निवडणुकीसाठी ठरवले अपात्र

Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या, अमेरिकेच्या आणखी एका राज्याने निवडणुकीसाठी ठरवले अपात्र

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड (Donald Trump) ट्रम्प यांच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. आता एका महिन्यात त्यांना दुसरा झटका बसला आहे. अमेरिकेतील राज्य कोलोराडो नंतर आता मेन राज्याने २०२४ मधील राष्ट्राध्यक्ष प्राथमिक निवडणुकीत त्यांना अपात्र ठरवले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना पुढील वर्षी होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष प्राथमिक निवडणुकीत अपात्र ठरवण्यात आले. मेन राज्याच्या सर्वोच्च निवडणूक अधिकाऱ्याने हा निर्णय घेतला. ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटोलवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांना प्रतिबंध करणारे मेन हे दुसरे राज्य आहे.

२०२४ मधील निवडणुकीत रिपब्लिकनच्या नामांकनात ट्रम्प यांचे नाव आघाडीवर होते. पण त्यांनी २०२० च्या निवडणुकीत मतदारांच्या फसवणुकीबद्दल खोटे दावे पसरवले आणि बंडखोरांना भडकवले, असे डेमोक्रॅट नेत्या मेनच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट शेन्ना बेलोज यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना कॅपिटोलवर मोर्चा नेण्याचे आवाहन केले आणि खासदारांना मत प्रमाणित करण्यापासून रोखले, असेही त्या म्हणाल्या.

१९ डिसेंबर रोजी कोलोराडोच्या न्यायालयाने ट्रम्प यांना राज्य प्राथमिक मतपत्रिकेतून अपात्र ठरवले. यामुळे ते बंडखोरी प्रकरणी अध्यक्षपदासाठी अपात्र ठरलेले अमेरिकेच्या इतिहासातील पहिले उमेदवार आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी कोलोराडोच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.

हा निर्णय केवळ मार्चच्या प्राथमिक निवडणुकीपुरता मर्यादित आहे. पण त्याचा परिणाम नोव्हेंबरच्या सार्वत्रिक निवडणुकीत ट्रम्प (Donald Trump) यांच्या भवितव्यावर होऊ शकतो.

२०२० ची निवडणूक उलथवून टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ट्रम्प यांना फेडरल आणि जॉर्जियामध्ये दोन्ही ठिकाणी दोषी ठरवण्यात आले आहे. २०२४ मधील रिपब्लिकन नामांकनाच्या शर्यतीत ट्रम्प ओपिनियन पोलमध्ये मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news