‘भुकेने तडफडून मृत्‍यू झाला असता….’ गाझात अमेरिकन नर्सने अनुभवल्‍या मरणयातना

गाझातून अमेरिकेतील परतलेल्‍या परिचारिका (नर्स) एमिला कॅलाहान.
गाझातून अमेरिकेतील परतलेल्‍या परिचारिका (नर्स) एमिला कॅलाहान.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायल आणि हमास यांच्यात महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. हा संघर्ष दिवसोंदिवस अधिक चिघळत चालल्‍याचे दिसत आहे. आतापर्यंत १० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धाचे भयावह रुप संपूर्ण गाझामधून व्‍हायरल होत असलेल्‍या व्‍हिडिओच्‍या माध्‍यमातून पाहत आहे.  अशाच मरणयातनाचा अनुभव गाझातून अमेरिकेतील परतलेल्‍या परिचारिका (नर्स) एमिला कॅलाहान यांनी 'सीएनएन'ला दिलेल्‍या मुलाखतीवेळा शेअर केला. ( US nurse rescued from Gaza )

उपासमारीने मृत्‍यू झाला असता…

'डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स'मध्ये कॅलाहाना गाझामध्‍ये काम करत होत्‍या. गाझामध्‍ये आरोग्‍यसेवा दिल्‍यानंतर मागील आठवड्यात त्‍या अमेरिकेत परतल्‍या आहेत. युद्धग्रस्त गाझामधील भीषण वास्‍तव्‍याचे अनुभव सांगताना त्‍या म्‍हणाल्‍या की, माझ्‍यासह माझ्‍या टीममधील सदस्‍यांचा गाझामध्‍ये अन्न आणि पाण्याच्या अभावामुळे भुकेने तडफडून मृत्‍यू झाला असता. हे सांगताना मी अतिशयोक्ती करत नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. अन्‍न आणि पाणी याचा पुरवठाच होन नसल्‍याने गाझा शहरातील नागरिक अत्‍यंत हलाख्‍याच्‍या स्‍थितीत जगत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

 US nurse rescued from Gaza : मृत्‍यूची टांगती तलवार…

७ ऑक्‍टोबर रोजी हमासने इस्रायलवर भीषण हल्‍ला केला. याला प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी इस्‍त्रायलने केलेल्‍या हल्‍ल्‍यात पहिल्या आठवड्यात झालेल्‍या स्‍फाेटात कॅलाहान याची सहकारी नर्सचा मृत्‍यू झाला होता. माझ्‍यावर आणि माझ्‍या सहकार्‍यांवर मृत्‍यूची टांगती तलवार होती. कोणत्‍याही क्षणी आम्‍हाला ठार मारले जाण्‍याची शक्‍यता होती. तरीही शक्‍य तितक्‍या जखमी लोकांचे प्राण वाचविण्‍यासाठी आम्‍ही कार्यरत होतो. लोकांच्‍या प्राण वाचवताना मृत्‍यू येणार हे माहिती असूनही मी आणि माझ्‍या सहकार्‍यांनी काम सुरु ठेवले, असेही त्‍यांनी सांगितले.

 US nurse rescued from Gaza : शक्य तितक्या लोकांचे प्राण  वाचवत मरणार…

आम्‍हाला गाझा सोडण्याचे आदेश देण्‍यात आला. हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांना यासंदर्भात मला मेसेज केला. यासंदर्भात मी माझ्‍या सहकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी मला एकच उत्तर मिळालं, " हे आमचे कुटुंब आहे. हे आमचे मित्र आहेत. जर ते आम्हाला मारणार असतील, तर आम्ही शक्य तितक्या लोकांना वाचवत मरणार आहोत."  मी अमेरिकेत परतले;पण मला माझ्‍या सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेबद्दल दररोज काळजी वाटते. मी रोज सकाळी उठते आणि सहकार्यांना मसेज पाठवेत 'तू जिवंत आहेस का?'" तसेच रात्री झोपण्‍यापूर्वीही हाच मसेज पाठवते ' असेही त्‍यांनी सांगितले.

बॉम्‍ब हल्‍ल्‍यातील जखमी मुले त्‍याच अवस्‍थेत फिरतायत…

गाझा शहरावर इस्रायलकडून अविश्रांत बॉम्बफेक सुरु होती. चेहऱ्यावर, मानेसह सर्व अंगांवर मोठ्या प्रमाणात भाजलेली मुले उपचारासाठी येत होती. मात्र रुग्‍णालयांमध्‍ये उपचारासाठी जागाच नसल्‍याने त्‍यांना पुन्‍हा घरी सोडण्‍यात येत होते. संपूर्ण रुग्‍णालये खचाखच भरली आहेत. यामध्‍ये जखमी मुलांची संख्‍या अधिक आहे. बॉम्‍ब हल्‍ल्‍यात जखमी झालेली मुले रस्‍त्‍यावर  जखमी अवस्‍थेतच फिरत आहेत. कृपया आम्‍हाला मदत करा, असा आक्रोश पालक करत आहेत;पण उपचाराची साधने कमी पडत होती. निर्वासित छावणीत सध्‍या ५० हजारांहून अधिक लोक वास्‍तव्‍यास आहेत. येथे केवळ चार शौचालये आहेत. या छावणीतील दर १२ तासांनी पाणी दिले जाते, असेही त्‍यांनी सांगितले.

 निर्वासितांच्‍या छावण्‍यामधील अवस्‍था अत्‍यंत बिकट, आरोग्‍य संकटाचाही धोका

पॅलेस्टिनी निर्वासितांना मदत करणार्‍या एजन्सी UNRWA च्या मते, गाझाच्या एकूण २० लाख लोकसंख्येपैकी सुमारे ७० टक्‍के लोकसंख्‍या अत्‍यंत संयुक्त राष्ट्रांच्या आश्रयस्थानांमध्ये अत्यंत वाईट परिस्थितीत राहत आहेत. अशा परिस्थितीमुळे पाणी आणि स्वच्छता पायाभूत सुविधांना झालेल्या नुकसानीमुळे सार्वजनिक आरोग्य संकटाचा धोका वाढला आहे.

७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी हमासने इस्‍त्रायलवर हल्‍ला केला. यानंतर इस्‍त्रायलने सुरु केलेल्‍या कारवाईत गाझामध्ये आतापर्यंत दहा हजारहून अधिक लोक मारले गेले आहेत तर इस्रायलमध्ये 1,400 हून अधिक लोक मरण पावले आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news