America : शाळा उघडल्यामुळे कोरोनाचा उच्छाद; सुमारे १.४१ लाख मुलं संक्रमित

America : शाळा उघडल्यामुळे कोरोनाचा उच्छाद; सुमारे १.४१ लाख मुलं संक्रमित
Published on
Updated on

अमेरिका (America) येथे कोरोनाचा विषाणू लहान मुलांना शिकार करत आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमित लहान मुलांचा वाढता आकडा हा जगासाठी धोक्याची परिस्थिती निर्माण करू शकते. अमेरिकेतील 'अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स'च्या अहवालानुसार ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान १ लाख ४१ हजार ९०५ लहान मुलांना कोरोना झाल्याची पुष्टी झालेली आहे.

या अहवालानुसार लहान मुलांच्या कोरोना संक्रमणाची गती ही ३२ टक्क्यांनी वाढलेली आहे. आकडेवारीचा विचार केला तर अमेरिकेमध्ये मागील आठवड्यात एक तृतीयांश लहान मुले कोरोना संक्रमित झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. अमेरिकेमध्ये लहान मुलांची संख्या २२ टक्के आहे. कोरोना महामारीच्या जाळ्यात ३ टक्क्यांपेक्षाही कमी मुले संक्रमणीत झाले आहेत. त्यानुसार ६८ लाख मुले ही संक्रमित झालेली आहेत.

अमेरिका (America) येथील अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या अहवाल असं सांगतो की, अमेरिकेच्या सहा राज्यांमध्ये कोरोनामुळे एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही. मुलांच्याच सामान्य लक्षणं दिसत आहे. मुलांना किरकोळ आजार होत आहेत. त्यामुळे मुलांना वेळोवेळी इंन्फ्लुयंजा, मेनिनजाईटिस, चिकनपाॅक्स आणि हिपॅटिटिसची लस दिली जात आहे. कारण, मुलांची प्रतिक्रिरशक्ती वाढेल.

सेंटर फाॅर डिजीज कंट्रोल एण्ड प्रिवेशन (सीडीसी) यांच्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये ५ ते ११ वयोगटातील ८३०० मुले कोरोना संक्रमित झाल्यानंतर रुग्णालयात भरती झाले. त्यामध्ये १७२ मुलांचा मृत्यू झाला. सीडीसीने असंही म्हंटलं आहे की, महामारीच्या वाढता वेग पाहता २३०० शाळा बंद करण्यात आला. त्याचा परिणाम १२ लाखांवर झालेला आहे. आता शाळा खुल्या केल्यामुळे पुन्हा कोरोनाचं संक्रमण झाले आहे, त्यामुळे धोक्याची सूचना देण्यात आली आहे.

पहा व्हिडिओ : कोल्हापूरचा अंध पैलवान गाजवतोय मोठ-मोठी मैदानं

हे वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news